WhatsApp चा करा आता Safely वापर, 'या' ट्रिक्स फॉलो करा | WhatsApp Tricks | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

whats app

WhatsApp चा करा आता Safely वापर, 'या' ट्रिक्स फॉलो करा

WhatsApp Update: बिझनेस पासून वैयक्तिक गोष्टींपर्यंत आज आपण सगळेच डिजिटल दृष्ट्या एकमेकांशी कनेक्टेड आहोत मग त्यात एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी मेसेजिंग ॲप असो किंवा पेमेंट करण्यासाठीचे ॲप किंवा अगदी छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करणे, सर्वांसाठी डिजिटल मीडिया हे खूप फायदेशीर माध्यम झाले. खरं डिजिटल मीडियाचा भाग होणे ही हौस नसून काळाची गरज झाली आहे. पण जेवढे हे जग भुरळ घालणारे आहे, तेवढेच प्रत्यक्षरीत्या हानिकारक देखील आहे.

व्हॉट्सॲप ची काही वैशिष्ट्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे आपल्या प्रियजनांशी बोलतांना तुम्ही सुरक्षितरित्या डिजिटल मीडियाचा विशेषत: व्हॉट्सॲपचा वापर करू शकता. चला तर जाणून घेऊया.

हेही वाचा: IRCTC : रेल्वेचा PNR नंबर आणि रेल्वेचे लाईव्ह स्टेटस WhatsApp वर कसे चेक करावे?

मेसेज फॉरवर्ड करतांना नीट विचार करणे -

व्हॉट्सॲप मध्ये सतत फॉरवर्ड झालेल्या मेसेज वर forwarded messages अशी खूण येते, त्या बरोबर एक चिन्ह देखील येते. याचा अर्थ हा मेसेज खूप व्यक्तींनी फॉरवर्ड केलेला असतो. एक युजर म्हणून ही आपली जबाबदारी आहे की तो मेसेज पुढे फॉरवर्ड करण्याआधी त्यात नक्की काय माहिती आहे, त्याने कोणाचे नुकसान तर होणार नाही ना आणि सगळ्यात महत्वाचे ही माहिती खरी आहे ना? हे तपासणे. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर ती माहिती फॉरवर्ड न केलेलीच बरी.

फॅक्ट चेक करणे -

भारतामध्ये एकूण १० तथ्य फॅक्ट चेक संस्था आहेत ज्या युजर ने पाठवलेली माहिती ओळखू शकतात, त्याची चाचपडताळणी करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अडचण ठरणाऱ्या मेसेजला फॉरवर्ड करण्यापासून थांबवू देखील शकतात. व्हॉट्सॲप आपल्या युजर्सला पाठवलेले किंवा आलेले मेसेजेस खरे आहेत का ह्याची पडताळणी करण्यासाठी द पॉइंटर इन्स्टिट्यूटच्या आयएफसीन व्हॉट्सॲप चॅटबोट (IFCN Whatsapp Chatbot) वर मजकूर पाठवून मदत करतात.

हेही वाचा: Whatsapp new feature: आता तारखेनुसार बघता येणार जुने मॅसेज

टू स्टेप व्हेरिफिकेशन (Two step verification) -

व्हॉट्सॲपने त्यांच्या युजर्ससाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन फीचर सुरू केले आहेत, ज्यामुळे जरी तुम्ही तुमचे अकाऊंट uninstall केले किंवा फोन बदलला किंवा तुमचा फोन चोरीला गेला तर त्यावेळी ह्या फिचरच्या सहाय्याने तुम्ही सहा आकडी कोड टाकून अकाऊंट सुरू करू शकतात. यामुळे तुमचं अकाऊंट तुम्ही सोडून दुसरं कोणीही वापरू शकत नाही.

नको असलेले कॉन्टॅक्ट ब्लॉक करा -

आधीच्या एसएमएसच्या तुलनेत व्हॉट्सॲप आपल्या युजर्सला नको असलेले कॉन्टॅक्ट किंवा अकाऊंट ब्लॉक करण्याचा पर्याय उपलब्ध करून देतात. जर तुम्हाला कोणता चुकीचा किंवा आक्षेपार्ह मेसेज आढळला किंवा तुम्हाला त्या व्यक्तीशी परत संपर्क ठेवावासा वाटतं नसेल तर तुम्ही त्याला ब्लॉक करू शकता.

हेही वाचा: Whatsapp Feature: व्हॉट्सॲपचं नवं फिचर माहिती होताच तुमचीही उडेल झोप, चक्क मॅसेज...

संवाद खाजगी ठेवा -

Disappearing Messages च्या मदतीने वैयक्तिक किंवा ग्रुप मधले मेसेज २४ तासानंतर आपोआप डिलीट होतात त्याचबरोबरीने व्ह्यू वन्स (view once) च्या मदतीने एखादा फोटो किंवा व्हिडीओ कोणालाही एकदाच बघता येऊ शकतो अशीही सेटिंग तुम्ही करू शकतात. ह्यामुळे तुमचे मेसेजची प्रायव्हसी राखली जाते.

ऑनलाईन नक्की काय शेअर केले जाते आहे ह्याची काळजी घ्या-

आजकाल ऑनलाईन पोर्टलमुळे अनेकदा आपली वैयक्तिक माहिती पसरण्याची भीती संभावते. आपला पत्ता, पासवर्ड, क्रेडिट कार्डचे नंबर, बँक अकाऊट नंबर ही माहिती बाहेर कोणाला शेअर करू नये. व्हॉट्सॲप चे फिचर्स आपली अशीच काही माहिती गोपनीय राहील यासाठी मदत करतात.

जसे की तुमचा प्रोफाइल फोटो, लास्ट सीन, ऑनलाईन स्टेटस, स्टेटस, कॉन्टॅक्ट ह्या गोष्टी. तुम्ही ऑनलाईन आहात की नाही यावर नियंत्रण ठेवू शकतात. तुम्ही ऑनलाईन आहात हे कोण बघू शकता.

लिंक वर क्लिक करतांना विचार करा:

इंटरनेटवर स्पॅम मेसेज, सायबर क्राईमचे धोका अधिक असतो. मग ती बनावट नोकरीची ऑफर असू शकते किंवा रोख पारितोषिक जिंकण्याची सुवर्णसंधी, किंवा अनोळखी व्यक्ती कडून सहली साठीचे बंपर, असे अनेक मेसेज व्हॉट्सॲप वर पाठवले जातात, हे फ्रॉड असतात. अशा घोटाळ्यांना बळी न पडण्यासाठी युजर्सनी जागरूक असले पाहिजे. म्हणून कोणत्याही लिंक वर क्लिक करण्याआधी नीट माहिती वाचा, त्यावर आपली वैयक्तीक माहिती पाठवू नका आणि अशा मेसेजला तुम्ही रिपोर्ट करू शकतात.

टॅग्स :Technologywhatsapp