Useful Government Apps: कामाची गोष्ट! भारत सरकारने लॉन्च केलेले हे Apps तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत!

भारत सरकारने काही महत्त्वाचे Apps लॉन्च केले आहेत
Useful Government Apps
Useful Government Appsesakal

Useful Government Apps: 

आपल्या मोबाईलमध्ये अनेक Apps असे आहेत जे आपल्या कामाचेही नाहीत. अशा नको असलेल्या Apps ने आपण मोबाईलचे स्टोरेज फुल करून टाकतो.  अशा बिनकामाच्या App पेक्षा भारत सरकारच्या काही कामाचे ऍप्स तुम्ही वापरू शकता. (Government Apps)

भारत सरकारने काही महत्त्वाचे Apps लॉन्च केले आहेत. जे नागरिकांच्या फायद्याचे आहेत. ज्या तरूणांना घरापासून दूर रहावे लागते अशांसाठी भारत सरकारचे काही Apps उपयोगी आहेत. चला आज आपण अशाच काही Apps बद्दल जाणून घेऊयात.

Useful Government Apps
Murmurre Appe Recipe : नाश्त्याला बनवा टेस्टी आणि हेल्दी मुरमुरे अप्पे, चवीला लागतात भन्नाट, नोट करा सोपी रेसिपी

Digi Locker

तरूणांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे App आहे. कारण, आजकाल सर्वांकडेच महत्त्वाची कागदपत्रे असतात. ती सतत आपण सोबत ठेऊ शकत नाही. अशावेळी, हे App तुमची मदत करणार आहे. कारण, तुमचे प्रत्येक डॉक्युमेंट यामध्ये ठेवता येणार आहे. प्लेस्टोर वर या App ला 4.1 रेटींग मिळाले आहे.

Voter Helpline App

लोकसभा, विधानसभा, नगरसेवक अशा कोणत्याही निवडणुकीत कामी येणारे हे app आहे. यामध्ये प्रत्येक मतदाराला हवी असलेली माहिती दिलेली असते. नवे मतदार, जुने मतदार यांना याचा जास्त फायदा होतो. आजवर 50 लाखांपेक्षाही अधिक लोकांनी हे App Download केले आहे.  

Useful Government Apps
Best Apps For Resume : Resume असा बनवा की कंपनीने फोन करून बोलावलं पाहिजे! हे Apps करतील जास्त मदत

mAdhaar

गेल्या काही वर्षात प्रत्येक कामात तुमचे आधार कार्ड लागते. तुमची ओळख, पत्ता सांगणारे आधार कार्ड नेहमीच कामी येते. पण हे आधार कार्ड कुठे न्यायचं विसरलं की प्रॉब्लेम येतो. त्यावेळी हे App तुमच्या कामी येते.

यामध्ये तुमचे डिजिटल आधार कार्ड आहे, जे तुम्ही कधीही कुठेही सोबत नेऊ शकता.

BHIM App

डिजिटल पेमेंटच्या जमान्यात भारत सरकारही मागे पडला नाही. भारत सरकारने डिजिटल पेमेंटसाठी हे ऍज बनवले आहे. ज्याच्या वापरू करून सुरक्षित डिजिटल पेमेंट करता येते.

भीम ऍपला प्ले स्टोअरवर 100 मिलियन लोकांनी डाऊनलोड केले आहे. तर लाखो लोकांनी रिव्ह्यू दिले आहेत.

Useful Government Apps
Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

MyGov

Play Store वर MyGov ॲपला 4.3 स्टार रेटिंग मिळाले आहे. या सरकारी ॲपला आतापर्यंत 66 हजार रिव्ह्यू आणि 5 लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे.

या ॲपद्वारे, भारतीय नागरिक त्यांच्या कल्पना, सूचना केंद्रीय मंत्रालय आणि स्थानिक संस्थांना सांगू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com