esakal | मेसेज वाचताच होतो गायब ; इंनस्टाग्राम आणि मेसेंजरची ही आहे कमालीची ट्रीक
sakal

बोलून बातमी शोधा

the users of social media the new feature of chatting clear recent from list

आपल्यातील बरेच युजर्स असे आहेत, जे चॅटिंगसाठी इंनस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरचा वापर करतात.

मेसेज वाचताच होतो गायब ; इंनस्टाग्राम आणि मेसेंजरची ही आहे कमालीची ट्रीक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : व्हाट्सअप मेसेंजरवर काही दिवसापूर्वी आलेले डीसएप्पीअर मेसेज फीचर खूप चर्चेचा विषय बनले होते. या फीचरमधून पाठवलेले मेसेज सात दिवसांनी आपोआप गायब होत होते. आपल्यातील बरेच युजर्स असे आहेत, जे चॅटिंगसाठी इंनस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरचा वापर करतात. त्यांच्यासाठी आम्ही इंनस्टाग्राम आणि मेसेंजरमधील फीचरबद्दल सांगत आहोत ज्यामुळे मेसेज गायब होतात. 

इंस्टाग्रामवरील वॅनिश मोड -  

फेसबुकने इंस्टाग्राम आणि मेसेंजरसाठी वॅनिश मोड समोर आणला आहे. हे एक नवे फीचर आहे, हे काही अंशी व्हाट्सअॅपच्या  डिसअॅररिंग मेसेजप्रमाणे आहे. फक्त फरक इतकाच आहे की, व्हाट्सअॅपमध्ये मेसेज सात दिवसानंतर गायब होतात. परंतु या फीचरच्या माध्यमातून इंस्टाग्राम आणि मेसेंजर मधून मेसेज वाचल्यानंतर लगेच गायब होतात. चला जाणून घेऊया हे फीचर कसे वापरावे...

अशा प्रकारे वॅनिश मोड वापरावे 

वॅनिश मोडसाठी सर्वांत महत्त्वाचे असते की तुमच्याजवळ अपडेटेड ॲप असले पाहिजे. फीचर अनेबल करण्यासाठी तुम्ही कोणत्याही एका अॅपवर जाऊ शकता. उदा. आपण इंस्टाग्राम घेतलं तर.. आता कोणत्याही एका चॅट विंडोला ओपन करा, आणि चॅटिंगच्या खालील भागात स्वाईप करा. असं करताच वॅनिश मोड सुरू होईल. आता तुम्ही जो मेसेज पाठवणार आहात तो मेसेज वाचून झाल्यानंतर हा मेसेज गायब होईल. आता तुम्ही कोणताही एक मेसेज पाठवलात आणि त्याचं रिडींग झालं की चॅटिंग बंद करताच तो मेसेज डीलीट होईल.

वॅनिश मोड बंद करण्यासाठी तुम्हांला अजून एकदा स्वाईप करावं लागेल. त्याच्याऐवजी चॅटिंग विंडो बंद केल्याने हा मोड ऑफ होऊन जातो.

loading image
go to top