Phone Charging : फोन चार्ज करताना वापरल्याने Blast होतो? मोबाईल कंपन्यांनीच सांगितलं खरं काय ते...

Using smartphone while charging: आपण असं अनेकदा वाचलं किंवा ऐकलं असावं की फोन चार्ज करताना वापरु नये.
Using smartphone while charging
Using smartphone while chargingsakal

Using smartphone while charging : आपण असं अनेकदा वाचलं किंवा ऐकलं असावं की फोन चार्ज करताना वापरु नये. यामुळे बॅटरीही खराब होऊ शकते सोबतच युजरलाही धोका निर्माण होऊ शकतो. अनेकदा अशा अनेक घटनाही समोर आल्या आहेत.

आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Using a Smartphone during Charging is Dangerous or not read what mobile company said )

फोन चार्ज करताना त्याचा वापर टाळावा पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही फोनचा वापर करू शकत नाही पण फोन चार्जिंगवर असताना कॉलवर बोलणे मात्र खूप धोकादायक आहे.

मात्र सर्व प्रकारचा वापर धोकादायक असतो, असे म्हणणे चुकीचे आहे. तुम्ही चार्ज करताना फोन वापरू शकता.

चार्ज करताना फोनचा वापर केल्यामुळे हीट रिलीज करते ज्यामुळे फोन गरम होतो. फोन चार्ज आणि ड्रेन सोबत होतं त्यामुळे त्याची बॅटरीवर याचा प्रभाव पडतो. मात्र यावर सॅमसंगचं म्हणणं वेगळं आहे.

सॅमसंगच्या मते, तुम्ही चार्ज करताना स्मार्टफोनचा वापर करता करू शकता, यामुळे कोणताही धोका निर्माण होत नाही.

Using smartphone while charging
Fast Charging : फास्ट चार्जिंग तुमच्या स्मार्टफोनसाठी तोट्याचं आहे का?

जगातल्या सर्वात मोठ्या मोबाइल फोन बनविणाऱ्यांपैकी एक असलेल्या सॅमसंगच्या मते जेव्हा तुम्ही चार्ज करताना फोन वापरता तेव्हा चार्जिंगची स्पीड कमी होते कारण जास्त पॉवर फोन मध्ये सुरू असलेल्या कामासाठी वापरला जातो.

मुळात चार्जिंग करताना फोन वापरावा की नाही, हा प्रश्न शोधण्यापेक्षा चार्जिंग करताना थोडा वेळ फोन वापरला नाही तर काय हरकत आहे. आपल्या सेफ्टीला आपण अधिक महत्त्व दिले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com