टेक्नोहंट : भूकंपाचा ‘टेक्नो’ इशारा

गुगल आपल्या वापरकर्त्यांना सतत नवनवे अपडेट देत असते. आता गुगल आपत्कालीन परिस्थितीतही आपल्या मदतीला धावून येणार आहे.
Earthquake Alert System
Earthquake Alert Systemsakal

- वैभव गाटे

गुगल आपल्या वापरकर्त्यांना सतत नवनवे अपडेट देत असते. आता गुगल आपत्कालीन परिस्थितीतही आपल्या मदतीला धावून येणार आहे. गुगलने भारतातील वापरकर्त्यांना भूकंपाचा इशारा देणारी प्रणाली (अर्थक्वेक अलर्ट सिस्टिम) रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे.

भूकंप येण्यापूर्वीच ही प्रणाली मोबाईल वापरकर्त्यांना सावध करेल. या प्रणालीमुळे जीवित आणि मालमत्ता हानी टाळण्यास मदत होणार आहे. चला तर जाणून घेऊयात काय आहे गुगलची ही ‘अर्थक्वेक ॲलर्ट सिस्टिम.’ गुगलची ही प्रणाली मोबाईलद्वारे काम करेल. सध्या हे ॲलर्ट फीचर अॅण्ड्राइड वापरकर्त्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याद्वारे, स्मार्टफोन वापरकर्त्याला तो उपस्थित असलेल्या परिसरात भूकंपाची शक्यता असल्यास इशारा देणारा संदेश मिळेल. हा संदेश पाहून वापरकर्ता सावध होऊ शकतो. विशेष म्हणजे, या प्रणालीसाठी गुगलने भारताच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मदत घेतली आहे. गुगलची ॲलर्ट प्रणाली यापूर्वीच अनेक देशांमध्ये लाँच करण्यात आली आहे.

स्मार्टफोनवर मिळेल ॲलर्ट

भूकंपाची इशारा पाठवण्यासाठी स्मार्टफोनमधील ॲक्सिलोमीटर या सेन्सर्सचा वापर केला जाईल. हा ॲक्सिलोमीटर ‘पी-वेव्ह’ ओळखू शकतो. प्रायमरी वेव्ह (पी-वेव्ह) प्राथमिक लहरी म्हणून ओळखल्या जातात. ज्या भूकंप येण्यापूर्वी जाणवतात. याच वेव्हच्या आधारे वापरकर्त्याला स्मार्टफोनवर अलर्ट मिळेल.

कशी काम करेल ॲलर्ट सिस्टिम?

मोबाईलमध्ये असलेला ॲक्सिलोमीटर भूकंप येण्याची सूचना देताना एखाद्या सिस्मोमीटरप्रमाणे काम करेल. एखाद्या फोनने भूकंपासारखे झटके ॲक्सिलोमीटरद्वारे डिटेक्ट केले, तर ही माहिती तो गुगल सर्व्हरला देईल. हा सर्व्हर भूकंपाची शक्यता आहे का याचा अंदाज बांधेल.

याशिवाय भूकंपाचा केंद्रबिंदू आणि तीव्रता याचीही माहिती याद्वारे मिळेल. त्यानंतर गुगल सर्व्हर आसपासच्या मोबाईलला अर्थक्वेक ॲलर्ट पाठवेल. हा सावधगिरीचा इशारा मिळाल्याने वापरकर्त्या भूकंपाच्या घटनेपूर्वीच सावध होऊ शकतो.

सर्चबारमध्ये सर्च करता येणार

अर्थक्वेक ॲलर्ट सिस्टिम भारतात ॲण्ड्राइड ५ च्या पुढील फोनमध्ये उपलब्ध आहे. ते लवकरच स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले जाईल. त्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचा स्मार्टफोन अपडेट ठेवावा लागेल. याशिवाय आपल्या आसपास भूकंप आला आहे असे जाणवल्यास वापरकर्ते गुगल सर्चबारमध्ये ‘earthquake near me’ असे सर्च करून भूकंपाची तीव्रताही तपासू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com