टेक्नोहंट : ‘मॉन्स्टर’ बॅटरीचा बिग स्टोरेज फोन

मोबाइलचा वापर वाढल्याने मोठी बॅटरी, मोठी स्टोरेज क्षमता ही वापरकर्त्यांची प्राथमिकता झाली आहे. हीच गरज ओळखून आयटेलने बजेट फ्रेंडली मात्र, दमदार स्मार्टफोन लॉंच केला.
p40 plus smartphone
p40 plus smartphonesakal

- वैभव गाटे

मोबाइलचा वापर वाढल्याने मोठी बॅटरी, मोठी स्टोरेज क्षमता ही वापरकर्त्यांची प्राथमिकता झाली आहे. हीच गरज ओळखून आयटेलने बजेट फ्रेंडली मात्र, दमदार स्मार्टफोन लॉंच केला आहे. नुकत्याच लॉंच झालेल्या ‘पी ४० प्लस’मध्ये ५, ६ हजार एमएएचची नाही तर तब्बल ७,००० एमएएचची बिग बॅटरी देण्यात आली आहे. ‘बॅटरी मॉन्स्टर’ असलेल्या या फोनमध्ये १२८ जीबीची स्टोअरेज क्षमताही देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते फीचर या बजेट फोनला स्मार्ट बनवतात पाहूयात...

डिस्प्ले

दमदार बॅटरी, तगडी स्टोरेज क्षमता यासह फोनच्या अन्य खासियतींपैकी एक म्हणजे या फोनची बिग स्क्रीन, तीही एचडी प्लस. यामुळे स्ट्रीमिंगचा अनुभव आणखीनच खास ठरतो. आयपीएस एलसीडी डिस्प्ले आणि ७२० x १६४० पिक्सल रिझॉल्युशन यामुळे व्हिडिओंतील रंगसंगती, क्लिअॅरिटी आकर्षक वाटते. फोनमध्ये ९० हर्ड्‌झचा रिफ्रेश रेट दिल्यामुळे स्क्रीन वेगाने काम करते. किमतीच्या तुलनेत डिस्प्ले क्वालिटी उत्तम देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे.

डिझाइन

मोठी स्क्रीन असल्याने मोबाइलचा आकार थोडा मोठा वाटतो. मात्र, तरीही फोन हॅन्डी करण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. बॅक पॅनल, कॅमेराची प्लेसमेंट, कॅमेराच्याभोवती असलेली ग्लॉसी डिझाइन यामुळे मोबाइलचा मागील लूक आकर्षक वाटतो. बॅटरी मोठी असल्याने फोन हाताळताना थोडा जड वाटतो, परंतु वजन बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

बॅटरी

७,००० एमएएचची बॅटरी. सामान्य वापरानंतर बॅटरी जवळपास तीन दिवस टिकली. व्हिडिओ स्ट्रिमिंग, म्युझिक प्लेनंतर बॅटरी दीड दिवसांपेक्षा जास्तवेळ टिकली. दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीमुळे स्ट्रीमिंगमध्ये अडथळा येत नाही. फोनसह १८ वॉटचा सी-टाइप चार्जर देण्यात आला आहे. तो आणखी मोठा हवा होता.

कॅमेरा क्वालिटी

ड्युअल कॅमेरा सपोर्ट असलेल्या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा एआय रेअर आणि ८ मेगापिक्सलचा एआय फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरातील ऑटोफोकस वेगाने काम करतो. व्हिडिओ क्वालिटीही चांगली देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन

  • ओएस : अ‍ॅण्ड्रॉइड १२

  • प्रोसेसर : ऑक्टा- कोर युनिसॉक T६०६

  • रॅम : ४ + ४ जीबी

  • स्टोरेज : १२८ जीबी इंटरनल + १ टीबी एक्सपांडेबल

  • बॅटरी : ७,००० mAh

  • डिस्प्ले : ६.८ इंच एचडी प्लस पंच होल

  • कॅमेरा : रेअर १३ MP (ड्युअल) एआय + फ्रंट ८ MP

  • उपलब्ध रंग : फोर्स ब्लॅक, आइस सायन

  • किंमत : ८,१०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com