टेक्नोहंट : फेक मेसेजपासून सावधान!

‘तुम्ही बक्षीस जिंकले आहे’, ‘पाच लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज असलेली नोकरी तुम्हाला मिळू शकते’, ‘तुम्ही २ लाख रुपयांचे कर्ज घेण्यासाठी पात्र आहात’... असे संदेश तुम्हाला अनेकदा आले असतील.
Message
MessageSakal

- वैभव गाटे

‘तुम्ही बक्षीस जिंकले आहे’, ‘पाच लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज असलेली नोकरी तुम्हाला मिळू शकते’, ‘तुम्ही २ लाख रुपयांचे कर्ज घेण्यासाठी पात्र आहात’... असे संदेश तुम्हाला अनेकदा आले असतील. हे संदेश तुमची खासगी माहिती किंवा बँक खात्याशी संबंधित माहिती चोरण्यासाठी आलेले असतात. या संदेशांना ‘फेक’ किंवा ‘स्कॅम मेसेज’ म्हणतात. भारतात इंटरनेट वापरकर्त्यांना दररोज किमान १२ फेक मेसेज येतात. नागरिक त्यांना आलेले अशा प्रकारचे मेसेज ‘फेक’ आहेत की नाही, यावर विचार करण्यासाठी आठवड्यातील साधारण १०५ मिनिटे खर्च करतात.

सायबर गुन्ह्यांची नवनवीन प्रकरणे रोज समोर येत आहेत. त्यामुळे अशा फेक, स्कॅम मेसेजपासून आपणच सावध राहणे हा प्रभावी उपाय आहे. अँटीव्हायरस, मोबाईल सुरक्षेबाबत ‘मॅकफी’ने नुकताच यासंबंधित एक जागतिक अहवाल सादर केला आहे.

८२ टक्के वापरकर्त्यांकडून ‘क्लिक’

‘मॅकफी’च्या अहवालानुसार मेल, मेसेज, समाजमाध्यमांद्वारे एका भारतीय नागरिकाला दिवसभरात किमान १२ फेक मेसेज येत असल्याचे उघड झाले. यातील अनेक संदेश नोकरी, बक्षीस, बँक अलर्ट, ओटीटी सब्सक्रिबशन अशांबाबत असतात. अशा फेक मेसेजेसवर ८२ टक्के वापरकर्ते क्लिक करतात. विशेष म्हणजे, ६४ टक्के युजर्स नोकरीशी संबंधित संदेशाच्या जाळ्यात अडकतात, तर ५२ टक्के युजर्स फेक बँक संदेशाला बळी पडतात.

क्लिक करण्याची शक्यता

१. तुम्ही बक्षीस जिंकले आहे : ४१ टक्के

२. वस्तू डिलिव्हरी समस्या : २३ टक्के

३. खरेदीबद्दल माहिती : २४ टक्के

४. साइन इन संबंधित : २४ टक्के

फेक मेसेजचे स्वरूप

  • तुम्ही बक्षीस जिंकले आहे : बक्षीस किंवा लॉटरी जिंकल्याच्या संदेशाचा हेतू बँक खात्यांची माहिती चोरण्याचा असतो.

  • शॉपिंग अलर्ट : मेसेज, मेलद्वारे मिळणाऱ्या या संदेशाद्वारे यूआरएल लिंक पाठविल्या जातात. त्याद्वारे ‘केवायसी’ पूर्ण करण्याची विनंती केली जाते. बँकेतील पैसे चोरण्याचा हेतू असतो.

  • मिस डिलिव्हरी : तुम्ही मागवलेल्या वस्तूची डिलिव्हरी रद्द झाल्याचा संदेश येतो. तुम्ही कोणतीही वस्तू मागविलेली नसेल तर समजा असा संदेश फेक आहे.

  • नोकरीची संधी : तुम्हाला ५ लाख रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी मिळण्याची संधी आहे, अशा स्वरूपाचा संदेश येतो. त्यावर दिलेल्या यूआरएलवर क्लिक करणे टाळावे.

  • ओटीटी सबस्क्रिप्शन : मोफत ओटीटी सबस्क्रिप्शनसंबंधित संदेश येतात. त्यावर दिलेल्या यूआरएलद्वारे लूट केली जाते.

फेक मेसेज ओळखणे कठीण

‘मॅकफी’ने हा सर्व्हे भारतासह अन्य सात देशांत केला. यात ७ हजार युजर्सनी भाग घेतला. या सर्व्हेनुसार, ६० टक्के भारतीयांना फेक किंवा स्कॅम मेसेज ओळखणे कठीण जाते. फेक मेसेज पाठवणारे ‘एआय’ टूल्सचाही वापर करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com