टेक्नोहंट : फ्लिप, फोल्ड स्मार्टफोनचा ट्रेंड

अ‍ॅण्ड्रॉइड लव्हर व्हर्सेस आयओएस लव्हर हे युद्ध आपल्याकडे नेहमीच पाहायला मिळते. यात मोबाईल तयार करणाऱ्या कंपन्याही मागे नाहीत.
Smartphone
Smartphonesakal

- वैभव गाटे

अ‍ॅण्ड्रॉइड लव्हर व्हर्सेस आयओएस लव्हर हे युद्ध आपल्याकडे नेहमीच पाहायला मिळते. यात मोबाईल तयार करणाऱ्या कंपन्याही मागे नाहीत. अ‍ॅण्ड्रॉइड मोबाईल तयार करणाऱ्या कंपन्याही आयफोनला टक्कर म्हणून एकदम हटके आणि काही खास फीचर्स असलेले फोन बाजारात आणत आहेत. फ्लिप आणि फोल्डेबल स्मार्टफोन त्यांपैकी एक. सध्या बाजारात लाँच झालेल्या अशाच फोनबद्दल अधिक जाणून घेऊ.

अ‍ॅण्ड्रॉइड लव्हर नेहमीच आयफोनला पर्याय म्हणून बाजारातील बेस्ट आणि हटके स्मार्टफोनला पसंती देत असतात. अशा युजरसाठी सॅमसंग, वन प्लस, मोटोरोला, ओपो, टेक्नो या कंपन्यांनी फ्लिप आणि फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. त्यात अ‍ॅण्ड्राइडचा बिग प्लेअर ‘गुगल’ही मागे नाही.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ५

सॅमसंगने या फ्लिप फोनमध्ये ३.४ इंच कव्हर डिस्प्ले दिला असून, मुख्य डिस्प्ले ६.७ इंच आहे. कव्हर डिस्प्ले मोठा देण्यात आल्याने त्यात नोटिफिकेशन, मेसेज पाहणे सोपे जाते. कव्हर डिस्प्लेला ७२० बाय ७४८ चा रिझॉल्यूशन देण्यात आला आहे. अ‍ॅण्ड्रॉइड १३ असलेल्या या फोनमध्ये स्पॅनड्रॅगन ८ जेन २ सीपीयू देण्यात आला आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम देण्यात आला असून, तो २५६ जीपी आणि ५१२ जीबी स्टोरेजसह उपलब्ध होतो. या फोनचा रिअर कॅमेरा १२ एमपी + १२ एमपीचा असून, फ्रंट कॅमेरा १० एमपीचा आहे. ३,७०० एमएएचची बॅटरी या फोनमध्ये दिली गेली आहे.

किंमत - ९९,९९९ रुपये

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ५

‘झेड फ्लिप ५’ पेक्षा अधिक बजेट असल्यास त्याला पर्याय म्हणून ‘झेड फोल्ड ५’ युजर्स खरेदी करू शकतात. या फोनमध्ये ६.१ इंच ओएलईडी आउटर डिस्प्ले आणि ७.६ इंच मुख्य डिस्प्ले देण्यात आला आहे. मोठ्या आउटर डिस्प्लेमुळे हा फोन हाताळताना सोपा वाटतो. या फोनमध्येही कंपनीने अ‍ॅण्ड्रॉइड १३ दिला असून, स्पॅनड्रॅगन ८ जेन २ सीपीयू दिलेला आहे. १२ जीबी रॅम असलेला हा फोन २५६, ५१२ जीबीसह १ टीबीमध्येही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात ५० एमपी + १२ एमपी + १० एमपीचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, तर फ्रंट कॅमेरा १० एमपीचा आहे. या फोनमध्ये ४,४०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत - १,५४,९९९ रुपये

मोटो रेझर ४० अल्ट्रा

मोटोरोलाने या फ्लिप स्मार्टफोनमध्ये ३.६ इंचाचा पीओएलईडी कव्हर डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेमध्ये १४४ हर्ड्सचा रिफ्रेश रेट मिळतो, तर ६.९ इंचाचा मुख्य डिस्प्ले देण्यात आला आहे. अ‍ॅण्ड्रॉइड १३ असलेला या फोनमध्ये स्पॅनड्रॅगन ८ प्लस सीपीयू देण्यात आला आहे. यात १२ एमपीचा रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. ८ जीबी रॅम असलेला हा फोन २५६ जीबी स्टोअरेजसह उपलब्ध आहे. तर, या फोनमध्ये ३,८०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनचे वजन १९१ ग्रॅम आहे.

किंमत - १,१९,९९९ रुपये

ओपो फाइंड एन २ फ्लिप

ओपोने या फ्लिप फोनमध्ये ३.४ इंचाचा कव्हर डिस्प्ले दिला असून, मुख्य डिस्प्ले ६.८ इंचाचा आहे. अ‍ॅण्ड्रॉइड १३ असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेक डायमेनसिटी ९००० प्लस चिपसेट देण्यात आली आहे. याचा रेअर कॅमेरा ५० एमपी असून, फ्रंट कॅमेरा ३२ एमपीचा आहे. ८ जीबी रॅम असलेला हा फोन २५६ जीबी स्टोअरेजसह उपलब्ध होतो. या फोनमध्ये ४,३०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत - ९९,९९९

गुगल पिक्सल फोल्ड

गुगलने ग्लोबली लाँच केलेला हा फोन भारतात ऑक्टोबरच्या अखेरीसपर्यंत विक्रीला येण्याची शक्यता आहे. ५.८ इंच आउटर डिस्प्लेसह या फोनमध्ये ७.८ इंच मुख्य डिस्प्ले देण्यात आला आहे. अ‍ॅण्ड्रॉइड १३ असलेल्या या फोनमध्ये गुगल टेंसर जी २ सीपीयू असेल. १२ जीबी रॅममध्ये असलेला हा फोन २५६ आणि ५१२ जीबीमध्ये उपलब्ध होईल. या फोनचा रेअर कॅमेरा ४८ एमपी+१०.८ एमपी + १०.८ एमपी असा ट्रिपल सेटअपमध्ये असेल, तर फ्रंट कॅमेरा ८ एमपीचा असेल. या फोनची बॅटरी ४,७२७ एमएएचची असेल.

किंमत (अंदाजे) - १,४७,००० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com