टेक्नोहंट : गुगल मेसेजवर घ्या ‘फोटो इमोजी’चा आनंद

ॲपल आपल्या वापरकर्त्यांना आयमेसेजमध्ये फोटोपासून इमोजी तयार करण्याचे फीचर देते. असेच फीचर आता गुगलने आणले आहे.
Google Message Imogi
Google Message Imogisakal

- वैभव गाटे

ॲपल आपल्या वापरकर्त्यांना आयमेसेजमध्ये फोटोपासून इमोजी तयार करण्याचे फीचर देते. असेच फीचर आता गुगलने आणले आहे. आयमेसेजशी स्पर्धा करण्यासाठी टेक्स्ट मेसेजची सेवा देणाऱ्या गुगल मेसेजमध्ये ‘फोटोमोजी’ हे खास फीचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये वापरकर्ते कस्मटमाइझ इमोजी बनवून शेअर करू शकतात. विशेष म्हणजे फोनमधील गॅलरीतील फोटोचा वापर करूनही युजर्स फोटो इमोजी तयार करू शकतील. या फीचरमुळे आता मेसेजिंगचा अनुभव आणखी खास होईल.

गुगलने नुकतेच मेसेजिंग ॲप असलेल्या गुगल मेसेजसाठी फोटोमोजी हे मजेदार फीचर लॉन्च केले आहे. एक अब्ज युजर्सचा टप्पा गाठल्यानंतर गुगलने नुकतीच या फीचरची घोषणा केली होती. या ॲपमध्ये ३० कस्टमाइझ इमोजी तयार करण्याची, ते सेव्ह करून ठेवण्याची सुविधा आहे. हे इमोजी डिलीटही करता येतात. छायाचित्रातील आपल्या चेहऱ्यावरील भाव ओळखून ‘फोटोमोजी’ त्याचा मजेदार फोटोइमोजी तयार करून देतो.

हे फीचर चाचणीसाठी बीटा युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, आता ते सर्व युजर्सना उपलब्ध करून देण्यात आले आहे. लवकरच हे अपडेट सर्वांसाठी उपलब्ध होईल.

कसे वापराल फीचर?

  • गुगल मेसेज ॲप अपडेट करा.

  • ॲप ओपन करून न्यू चॅटवर क्लिक करा.

  • इमोजीच्या आयकॉनवर क्लिक करा.

  • त्यातील ''+'' बटणावर क्लिक करा.

  • क्रिएट किंवा पिक अ फोटो हा पर्याय निवडा.

  • फोटो क्रॉप करून फोटोमोजी सेव्ह करा.

  • यानंतर आपल्या स्नेही प्रियजनांशी चॅट करताना युजर फोटोमोजी शेअर करू शकतात.

गुगल मेसेजमधील अन्य फीचर

  • गुगल मेसेजमध्ये जीआयएफ, स्टिकर सेंड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय यावरून व्हॉट्सॲपप्रमाणे युजर फाइल शेअर करू शकतात. लोकेशन, संपर्क क्रमांक शेअर करण्याचे फीचरही आहे. विशेष म्हणजे यात मेसेज शेड्यूल करून सेंड करण्याचे खास फीचर देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com