टेक्नोहंट : ‘गुगल सर्च’चा अनुभव बदलणार

बहुप्रतीक्षित ‘एआय’आधारित (कृत्रिम बुद्धिमत्ता) गुगल सर्चचा अनुभव आता भारतीयांनाही घेता येणार आहे.
Google Search
Google Searchsakal

- वैभव गाटे

बहुप्रतीक्षित ‘एआय’आधारित (कृत्रिम बुद्धिमत्ता) गुगल सर्चचा अनुभव आता भारतीयांनाही घेता येणार आहे. गुगलने ‘सर्च लॅब्स’ हे टूल क्रोमवर भारतीय युजर्सला चाचणीसाठी उपलब्ध करून दिले आहे. अनेकांना हे टूल डेस्कटॉप आणि मोबाईलवर दिसू लागले आहे.

या टूलमुळे युजर्सला एखाद्या विशिष्ट माहितीसाठी रिझल्टमध्ये येणाऱ्या लिंकवर क्लिक करून माहिती शोधत बसण्याची गरज भासणार नाही. यापुढे क्रोम गुगलवरील उपलब्ध संपूर्ण माहिती एकत्रित करून ती युजर्सला दाखवेल.

इंग्रजी, हिंदीमध्ये सेवा

गुगलने भारतीयांसाठी ‘सर्च लॅब्ज’ हे युनिक फीचर ३१ ऑगस्टपासून उपलब्ध करून दिले आहे. सुरुवातीला ही सुविधा गुगलने अमेरिकेतील युजर्ससाठी सुरू केली होती. त्यानंतर आता हे टूल फीचर भारत आणि जपानमधील युजर्ससाठी दिले गेले आहे. या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे हे फीचर इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत वापरता येईल.

ज्या राज्यांमध्ये इंग्रजीशिवाय हिंदी भाषेचा वापर अधिक होतो, अशा राज्यांत इंग्रजी, हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हे फीचर उपलब्ध झालेले आहे. ज्या राज्यांमध्ये हिंदीचा वापर तुलनेने कमी होतो, तेथे केवळ इंग्रजीमध्ये हे फीचर उपलब्ध असेल. लवकरच यात टेक्स्ट-टू- स्पीच आणि व्हॉइस सर्च हा पर्यायही उपलब्ध होईल.

अशी मिळेल माहिती

सर्च लॅब्जसाठी साइन इन केल्यावर युजर गुगलला थेट प्रश्‍न विचारू शकतो आणि गुगलही त्याची संपूर्ण माहिती गोळा करून उत्तर देईल. उदाहरणार्थ, युजरने हाऊ टू बिकम डॉक्टर? असे सर्च केल्यास त्याला गुगल यासंबंधित संपूर्ण माहिती गोळा करून दर्शवेल.

डॉक्टर बनण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागेल, कोणते विषय शिकावे लागतील, तुमचे वय काय हवे ही आणि अशी संपूर्ण माहिती देईल. याला जोडून युजर्सना पडू शकणारे अन्य काही प्रश्‍नही गुगल स्वतः दर्शवेल. त्याआधारेही युजर्स अतिरिक्त माहिती जाणून घेऊ शकतात. हे फीचर दिले जात असले तरी गुगल सर्चची मूळ सेवा कायम सुरू राहील.

कसे वापराल फीचर?

  • क्रोमवर दिसणाऱ्या ‘सर्च लॅब्ज’ लोगोवर क्लिक करा

  • सर्च लॅब्जसाठी साइन इन करा

  • यानंतर नेहमी दिसणारी गुगल सर्चची विंडो सुरू होईल

  • त्यात तुम्हाला हवा असलेला प्रश्‍न विचारा

  • त्यानंतर जनरेटिव्ह एआय संपूर्ण माहिती गोळा करून तुम्हाला एकत्रित रिझल्ट दाखवेल

  • संबंधित माहितीच्या लिंकही दर्शवेल

  • तसेच त्या प्रश्‍नासंबंधित अन्य प्रश्‍न विचारण्याची मुभाही असेल.

  • युजर्सना पडणाऱ्या प्रश्‍नांसंबंधित प्रश्‍नही दर्शवेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com