Valentine Day 2023 : व्हॅलेंटाइन डे ला भारतीय कुठे शोधताय लव्ह पार्टनर? सर्व्हे वाचून चकीत व्हाल | Valentine Day 2023 where Indians are searching their love partners know survey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Valentine Day 2023 free dating sites

Valentine Day 2023 : व्हॅलेंटाइन डे ला भारतीय कुठे शोधताय लव्ह पार्टनर? सर्व्हे वाचून चकीत व्हाल

Valentine Day 2023 : आज लव्ह कपल्सचा खास दिवस म्हणजेच व्हॅलेंटाइन डे आहे. मात्र सिंगल लोक अजूनही त्यांचे लव्ह पार्टनर्स शोधताय. काही लोक आता डेटिंग अॅप्सवर त्यांचे लव्ह पार्टनर्स शोधू लागलेत . एका रिपोर्टनुसार मेट्रो सिटीच्या बाहेरचे लोकसुद्धा ऑनलाइन डेटिंग अॅप्सवर त्यांचे पार्टनर शोधू लागलेत.

लाइवमिंटच्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आलेय की Tinder, Bumble आणि TrulyMadly सारख्या डेटींग अॅप्सचा वापर झपाट्याने वाढत चाललाय.

याचा वापर केवळ मेट्रो शरहातच नाही तर अहमदाबाद, सूरत, लखनऊ , जयपूर आणि लखनऊसारख्या शहरांतही वाढताना दिसतोय.

best free dating sites in India

best free dating sites in India

ऑनलाइन प्रेम शोधण्याकडे लोकांचा कल

रिपोर्टमध्ये असासुद्धा दावा करण्यात आलाय की व्हर्च्युअल डेट्स हळू हळू नॉर्मल झालेत. मुली डेटिंग अॅप्सवर जास्त व्होकल होताना दिसताय. रिपोर्टनुसार, अगदी ७२ टक्के लोकांच्या मते त्यांना न भेटता ऑनलाइन प्रेमावर जास्त विश्वास आहे.

जास्तीत जास्त भारतीय व्हिडीओ डेटिंग अॅप Tinder चा वापर मोठ्या प्रमाणावर करताय. याच्या वापर करणाऱ्या शहरांमध्ये हैदराबाद शहर सगळ्यात पुढे आहे. यानंतर चेन्नई आणि बँगलोरचे यूजर्स आहेत.

तरुण पिढीमध्ये या अॅप्सची सगळ्यात जास्त क्रेज दिसून येते

रिपोर्ट्समध्ये हे सुद्धा सांगण्यात आलंय की, तरुण पिढी नवे संबंध, मैत्री वाढवण्यासाठी त्यांचे कनेक्शन्स वाढवण्यासाठी भेटींना जास्त महत्व देताय.

ग्लोबली यामध्ये २० टक्क्यांच्या वृद्धीची नोंद केल्या गेलीय. App Annie च्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेय की भारतात डेटिंग अॅप्स आणि फ्रेंडशिप अॅप्समध्ये सगळ्यात जास्त वाढ दिसून आलीय.

या कॅटेगिरीमध्ये वर्ष 2022 मध्ये आतापर्यंतची सगळ्यात मोठी तेजी नोंदवण्यात आलीय. अर्थात जास्तीत जास्त लोकांनी डेटिंग अॅप्स वापरण्यास पसंती दर्शवली आहे. (Dating App)