
Video: जीवघेणा दंश करणाऱ्या विंचवाची केली जाते शेती! विषाची किंमत ऐकून व्हाल हँग
नवी दिल्ली : तुम्हाला हे माहितीए का? जीवघेणा दंश करणाऱ्या विंचवाची शेती केली जाते. कशासाठी तर त्याच्या विषासाठी या विषाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ऐकून तर तुम्हीच वेडेच व्हाल! या विंचवाच्या शेतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाहुयात काय आहे ही बातमी. (Video Scorpion farm You will go crazy after hearing price of scorpion venom)
हेही वाचा: Sultanpuri Accident: चार पोलीस ठाण्यांसमोरुन गेली कार; 'ती' मात्र रस्त्यावर फरफटत राहिली!
वैज्ञानिक आणि प्राध्यापक असलेले चन्ना प्रकाश यांनी आपल्या ट्विटरवर विंचवाच्या शेतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत विंचवाचं पालन-पोषन कसं केलं जातं हे आपण पाहू शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणावरील विंचू पाहून तुम्हाला कदाचित भीतीही वाटेल. पण वैद्यकीय क्षेत्रातील प्रयोगांसाठी आणि औषध निर्मितीसाठी विंचवाची शेती केली जाते.
हेही वाचा: Bhagwant Mann : पंजाबचे CM मान यांच्या जीवाला धोका! घराजवळ सापडला जीवंत बॉम्ब
तुम्ही म्हणाल या शेतीचं उत्पादन काय आहे? याचं उत्पादन म्हणजे विंचवाचं विष! आता विष हे उत्पादन कसं काय? असंही तु्म्ही म्हणालं पण या विषाचा प्रतिविष म्हणून वापर केला जातो अर्थात एक औषध म्हणूनच त्याचा वापर केला जातो. त्यानुसार, विंचवाच्या विषाचा वापर हा औषध निर्मितीत केला जातो. त्यामुळं सहाजिकचं अशा नैसर्गिक पद्धतीनं तयार केलं जाणारं औषधंही तितकचं महाग असणार.
विंचवाच्या विषाची किंमत ऐकून डोळे विस्फारतील
जगातील सर्वात महागडा द्रव पदार्थ कुठला असेल तर तो विंचवाचं विष आहे. याची किंमत १,०३,०२,७०० डॉलर प्रति लिटर अर्थात सुमारे ८३ कोटी रुपये प्रति लिटर इतकी आहे. या विषामध्ये जे प्रथिनं (Protein) असतं त्याचा वापर स्वयंप्रतिरोधक विकारांच्या उपचारांमध्ये केला जातो. आतड्यांमध्ये दाहकता निर्माण करणारे विकार, संधिवात, मेंदू आणि मज्जापेशी नष्ट झाल्यामुळं होणाऱ्या आजारांमध्ये या प्रथिनांचा वापर केला जातो.