Mysterious Red Band : पृथ्वीच्या भोवती लाल रंगाचं रहस्यमयी कडं.. स्पेस स्टेशनवरुन घेतलेल्या फोटोमुळे वैज्ञानिकही चकित!

ISS Mysterious Picture : आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन हे पॅसिफिक समुद्रावर 258 मैल उंचीवर असताना हा फोटो टिपला आहे. यामध्ये पृथ्वीच्या क्षितिजावर असणारा सोनेरी रंगाचा पट्टा देखील दिसत आहे.
Mysterious Red Band
Mysterious Red BandeSakal

Mysterious Picture of Earth from ISS : अवकाशात असणाऱ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून पृथ्वीचे विहंगमय फोटो टिपले जातात. असाच एक फोटो सध्या सगळीकडे चर्चेचा विषय होत आहे. याला कारण म्हणजे, या फोटोमध्ये पृथ्वीच्या भोवती लाल रंगाचा एक पट्टा दिसत आहे. अंतराळवीर अँड्रेस मोगेन्सेन (Andreas Mogensen) यांनी हा फोटो टिपला आहे.

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (International Space Station) हे पॅसिफिक समुद्रावर 258 मैल उंचीवर असताना हा फोटो टिपला आहे. यामध्ये पृथ्वीच्या क्षितिजावर असणारा सोनेरी रंगाचा पट्टा देखील दिसत आहे. या पट्ट्याला 'एअरग्लो' (Airglow) म्हणतात. जेव्हा सूर्यकिरणे पृथ्वीच्या वातावरणातील अणू-रेणूंना धडकतात, तेव्हा एअरग्लोचा पट्टा तयार होतो.

या एअरग्लोच्या पट्ट्यावर लाल रंगाचा एक दुसरा पट्टाही या फोटोमध्ये दिसत आहे. वातावरणातील विविध प्रकारच्या कणांमुळे वेगवेगळ्या रंगांच्या छटा तयार होतात. धूळीतील कणांमुळे पिवळ्या रंगाचा थर दिसतो, तर वातावरणातील प्रदूषण किंवा धुरामुळे लाल रंगाची छटा दिसते. (Mysterious band circling Earth)

Mysterious Red Band
Antarctica Alien UFO : अंटार्क्टिकामध्ये दडलेत एलियन्स? गुगल मॅप्सवर यूएफओ दिसल्याच्या दाव्याने खळबळ

या फोटोमध्ये पृथ्वीचं विहंगमय दृश्य, वातावरणातील विविध पट्टे, मागे दाट अंतराळ, कोट्यवधी तारे आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचे काही भाग दिसत आहेत. आपल्या पृथ्वीचं वातावरण आणि सोलर रेडिएशन यांचा परस्पर संबंध अगदी सुंदर पद्धतीने दाखवणारा हा फोटो सध्या व्हायरल होतो आहे. (Picture taken from ISS)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com