Vivo S16 SmartPhone : ग्राहकांची चांदी! भन्नाट फिचरसह येतोय 'हा' स्मार्टफोन, कॅमेराही जबरदस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivo S16 SmartPhone

Vivo S16 SmartPhone : ग्राहकांची चांदी! भन्नाट फिचरसह येतोय 'हा' स्मार्टफोन, कॅमेराही जबरदस्त

Vivo SmartPhone : लवकरच Vivo X90 सीरीज जागतिक स्तरावर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की Vivo लवकरच Vivo V27 सीरीज देखील सादर करेल. कंपनी फ्लॅगशिप फोनसोबत मिड-रेंज फोनही आणत आहे. टिपस्टरने दावा केला आहे की कंपनी फेब्रुवारीच्या अखेरीस Vivo V27 सीरीज भारतात सादर करू शकते. अशी माहिती पुढे आली आहे की Vivo V27 सीरीजचे डिझाईन हुबेहुब Vivo S16 सीरीज सारखे असेल. चला जाणून घेऊया Vivo S16 सीरीजचे फिचर.

Vivo S16 स्पेसिफिकेशन्स

Vivo S16 आणि Vivo S16 Pro ला 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. दुसरीकडे, S16e मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे.

S16 आणि S16 Pro Qualcomm Snapdragon 870, आणि MediaTek Dimensity 8200 द्वारे प्रमोटेड आहे. हा फोन Android 13 वर चालतो. फोनमध्ये 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4600mAh बॅटरी आहे. S16 आणि S16e मध्ये 12GB पर्यंत RAM उपलब्ध असेल, तर Vivo S16 Pro मध्ये 12GB पर्यंत RAM मिळेल.

Vivo S16 कॅमेरा

Vivo S16 सीरीजच्या तिन्ही फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप वापरण्यात आला आहे. Vivo S16 मध्ये 64MP प्रायमरी सेन्सर आहे, तर Vivo S16 Pro मध्ये 50MP Sony सेन्सर आहे. सेल्फीबद्दल बोलायचे झाले तर Vivo S16 आणि Vivo S16 Pro मध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आहे. पण Vivo V27 सीरीजमध्ये किती मॉडेल्स सादर केले जातील याबद्दल काहीही माहिती दिली गेलेली नाही. (SmartPhone)