Vivo S30 and S30 Pro Mini mobile launch
Vivo S30 and S30 Pro Mini mobile launchesakal

Vivo S30 आणि S30 Pro Mini स्मार्टफोनची दमदार एंट्री; सुपर फीचर्स अन् आकर्षक डिझाईन, किंमत फक्त..

Vivo S30 and S30 Pro Mini mobile launch : विवो कंपनीने चीनमध्ये S30 आणि S30 Pro Mini हे दमदार फीचर्ससह नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.
Published on

Vivo S30 Series : चीनमध्ये प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने आपली नवीन S30 सिरीज लॉंच केली असून यामध्ये Vivo S30 आणि त्याचा कॉम्पॅक्ट व्हर्जन Vivo S30 Pro Mini यांचा समावेश आहे. दोन्ही स्मार्टफोन आधुनिक डिझाईन, प्रीमियम फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्ससह बाजारात आले आहेत.

S30 Pro Mini ही सिरीजमधील लहान पण प्रीमियम डिव्हाईस असून, यात 6.31-इंचाची LTPO AMOLED स्क्रीन आहे. यामध्ये MediaTek चा फ्लॅगशिप Dimensity 9300+ प्रोसेसर दिला आहे, जो गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी अत्यंत सक्षम मानला जातो.

याउलट, Vivo S30 मध्ये 6.67-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले असून, Snapdragon 7 Gen 4 चिपसेट दिला आहे. दोन्ही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन आहे, जी उत्तम व्हिज्युअल अनुभव देते.

पॉवर बॅटरी आणि फास्ट चार्जिंग

Vivo ने या दोन्ही फोनमध्ये 6,500mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली असून, ती 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विशेष म्हणजे S30 Pro Mini हे कॉम्पॅक्ट असल्यानेही त्यात मोठ्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे वजन फक्त 186 ग्रॅम असून जाडी 7.99 मिमी आहे हे स्मार्टफोनप्रेमींना खूप आकर्षित करणारे वैशिष्ट्य ठरते.

Vivo S30 and S30 Pro Mini mobile launch
Instagram Battery Drain : गुगलने केली इंस्टाग्रामची पोलखोल; अँड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्यांसोबत मोठा घोटाळा, नेमका विषय काय पटकन वाचा..

प्रो-लेव्हल कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी, दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे

  • 50MP मुख्य सेन्सर

  • 50MP 3x पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स

  • 8MP अल्ट्रावाइड लेन्स

Vivo S30 मध्ये Sony चा LYT-700V सेन्सर वापरण्यात आला आहे, तर Pro Mini मध्ये अधिक प्रगत Sony IMX921 सेन्सर आहे. दोन्हीमध्ये IMX882 टेलिफोटो सेन्सर आणि 50MP फ्रंट कॅमेरा ऑटोफोकससह दिला आहे सेल्फी प्रेमींसाठी ही मोठी खासियत आहे.

पाणी आणि धुळीपासून संरक्षण

Vivo S30 मध्ये IP64 रेटिंग असून ते पाणी व धुळीपासून संरक्षण देतो. मात्र S30 Pro Mini मध्ये अधिक प्रगत IP68/IP69 रेटिंग आहे, त्यामुळे तो अधिक कठीण वातावरणातही टिकून राहतो.

Vivo S30 and S30 Pro Mini mobile launch
Whatsapp new feature : अकाउंट डिलिट नाही, आता फक्त लॉगआउट! व्हॉट्सअ‍ॅपमध्ये गेमचेंजर फीचरची एन्ट्री; कसं वापरायचं एकदा बघाच

ऑपरेटिंग सिस्टीम आणि इंटरफेस

दोन्ही स्मार्टफोन Android 15 वर आधारित OriginOS 5 वर चालतात, जो एक स्टायलिश आणि सहज वापरता येणारा इंटरफेस आहे.

रंग आणि किंमती

Vivo S30-पीच पिंक, मिंट ग्रीन, लेमन यलो आणि कोकोआ ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध
Vivo S30 Pro Mini-कूल बेरी पावडर, मिंट ग्रीन, लेमन यलो आणि कोकोआ ब्लॅकमध्ये उपलब्ध

किंमत
Vivo S30

  • 12GB + 256GB – अंदाजे 31,000 रुपये

  • 12GB + 512GB – अंदाजे 34,500 रुपये

  • 16GB + 512GB – अंदाजे 37,900 रुपये

Vivo S30 Pro Mini

  • 12GB + 256GB – अंदाजे 40,000 रुपये

  • 16GB + 256GB – अंदाजे 43,500 रुपये

  • 16GB + 512GB – अंदाजे 45,900 रुपये

Vivo S30 and S30 Pro Mini mobile launch
Gold Earth Core : सोनं स्वस्त होणार? पृथ्वीच्या गाभ्यात दडलेला 'सोन्याचा खजिना' येतोय जमिनीवर; संशोधनातून समोर आली आश्चर्यकारक माहिती

उपलब्धता

Vivo S30 सिरीजसाठी चीनमध्ये प्री-ऑर्डर्स सुरू झाल्या आहेत आणि डिलिव्हरी 6 जूनपासून सुरू होणार आहे. भारतात याची लाँचिंग तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, मात्र Vivo चाहत्यांमध्ये या फोनबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नवीन डिझाईन, प्रीमियम कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह Vivo S30 सिरीज ही 2025 मधील एक प्रमुख स्मार्टफोन सिरीज ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com