लाईव्ह न्यूज

Vivo T4 Ultra 5G मोबाईलची भारतात विक्री सुरू; पहिल्या दिवसापासूनच बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स अन् ऑफर एकदा बघाच

Vivo T4 Ultra 5G Available in India Discount Offer : आजपासून Vivo T4 Ultra 5G भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. दमदार कॅमेरा, प्रीमियम फीचर्स आणि 3000 चा बँक डिस्काउंट मिळणार आहे
Vivo T4 Ultra 5G Available in India Discount Offer
Vivo T4 Ultra 5G Available in India Discount Offeresakal
Updated on: 

Vivo T4 Ultra 5G Offers : विवोचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन T4 Ultra 5G आजपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. मागील आठवड्यात लाँच झालेल्या या प्रीमियम डिव्हाईसवर पहिल्या विक्रीदरम्यान अनेक आकर्षक सवलती आणि बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. Vivo T3 Ultra च्या अपग्रेडेड व्हर्जनमधून सादर करण्यात आलेला हा फोन Samsung, OnePlus आणि Xiaomi सारख्या दिग्गज कंपन्यांच्या टॉप मॉडेल्सना टक्कर देण्यास सज्ज आहे.

जबरदस्त स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

Vivo T4 Ultra 5G मध्ये MediaTek Dimensity 9300+ चा पॉवरफुल प्रोसेसर असून, यासोबत 12GB RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 6.67 इंचाचा 1.5K क्वाड कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि तब्बल 5000 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. फक्त 7.45 मिमी जाडी असलेला हा फोन IP64 रेटिंगसह डस्ट व स्प्लॅश प्रूफ आहे.

कॅमेरा

हा फोन फोटोग्राफीप्रेमींसाठी खास आहे. यात 50MP OIS मुख्य कॅमेरा, 50MP पेरिस्कोपिक टेलीफोटो लेन्स (100x सुपर झूम), आणि 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटसाठी 32MP सेल्फी कॅमेरा आहे, जो व्हिडिओ कॉल्स आणि सेल्फीसाठी उत्कृष्ट आहे.

Vivo T4 Ultra 5G Available in India Discount Offer
Whatsapp ChatGPT : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आले ChatGPT; झाली नव्या फीचरची एंट्री, वापरा 'या' 3 स्टेप्समध्ये..

बॅटरी आणि चार्जिंग

फोनमध्ये 5,500mAh ची दमदार बॅटरी असून ती 90W टर्बो फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत फोन चार्ज होतो आणि दीर्घकाळ टिकतो.

सॉफ्टवेअर आणि AI फिचर्स

Vivo T4 Ultra वर Funtouch OS 15 (Android 15 आधारित) सॉफ्टवेअर आहे. यामध्ये Google Gemini AI प्रेरित स्मार्ट फिचर्स दिले आहेत Circle to Search, AI Translate, यांसारख्या सुविधा वापरकर्त्यांचा अनुभव अधिक स्मार्ट बनवतात.

Vivo T4 Ultra 5G Available in India Discount Offer
CCTV Tips : सीसीटीव्ही कॅमेरे तुमच्यावर गुपचूप ठेवतायत नजर? माहिती लिक होण्याआधीच तपासा 'या' 5 सेटिंग्ज

किंमत आणि ऑफर्स

हा स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये येतो

  • 8GB RAM + 256GB – 37,999 रुपये

  • 12GB RAM + 256GB – 39,999 रुपये

  • 12GB RAM + 512GB – 41,999 रुपये

फोनचे दोन आकर्षक कलर ऑप्शन आहेत Meteor Gray आणि Phoenix Gold.
पहिल्या सेलसाठी Vivo कडून 3 हजार पर्यंतची इन्स्टंट बँक सवलत देण्यात येत आहे.

कुठे खरेदी कराल?

Vivo T4 Ultra 5G आजपासून दुपारी १२ वाजेपासून Flipkart, Vivo च्या अधिकृत ई-स्टोअर आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com