
पतीने ओयो हॉटेलमध्ये पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पकडलं.
पत्नीने घाबरून थेट बाल्कनीतून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला.
हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Viral Video : संपूर्ण देशाला हादरवणारी एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका पतीने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत ओयो हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं आणि त्यानंतर घडलेला प्रसंग पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नवरा-बायकोचं नातं हे फक्त प्रेमावर नाही, तर परस्पर विश्वासावर उभं असतं. पण जर या नात्यात तिसरी व्यक्ती आली, तर त्या विश्वासाचा चुराडा होतो आणि हेच सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळतं आहे.
या व्हिडीओमध्ये दिसतं की एक महिला ओयो हॉटेलमधून धावत सुटते आणि नवऱ्यापासून वाचण्यासाठी थेट हॉटेलच्या बाल्कनीतून उडी मारते. तिच्यासोबत हॉटेलमध्ये तिचा प्रियकर असल्याचा आरोप करण्यात येतोय. पतीने अचानक हॉटेलमध्ये धडक दिल्यानंतर पत्नीने घाबरून धावपळ करत बाल्कनीतून उडी घेतली.
हा व्हिडीओ @tv1indialive या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत ९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, “ओयोमध्ये फसवणूक करताना बायकोला पकडलं, नवऱ्यापासून पळण्यासाठी थेट बाल्कनीतून उडी मारली!” सध्या या घटनेचा नेमक ठिकाण कुठं आहे, याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर यावरून जोरदार चर्चा रंगली आहे.
काही युजर्सनी या घटनेवर ताशेरे ओढलेत. एकाने लिहिलं, “आपल्या देशातील महिला आणि सर्वोच्च न्यायालय तिचं रक्षण करतील. नंतर तो पुरुषच दोषी ठरेल.” तर दुसऱ्याने कमेंट केली, “तिला पळून जाण्याचा मार्ग चांगलाच माहिती आहे.” आणखी एकजण म्हणतो, “रंगेहाथ पकडली गेल्यावर महिला काहीही करू शकते!”
या घटनेमुळे पुन्हा एकदा विवाहबाह्य संबंध, विश्वासघात आणि सामाजिक जबाबदारी याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बदलती जीवनशैली, सायबर दुनियेत वाढत चाललेली जवळीक, आणि नात्यांमध्ये येणारी बेईमानी हीच का आपल्या समाजाची नवी ओळख बनत आहे का? असा गंभीर प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे
ही घटना नेमकी कुठे घडली?
सध्या या व्हिडीओतील हॉटेलचे स्थान स्पष्ट झालेले नाही.
बायकोने उडी का मारली?
पतीकडून रंगेहाथ पकडले गेल्यानंतर घाबरून ती पळण्याच्या प्रयत्नात होती.
व्हिडीओ सोशल मीडियावर किती व्ह्यूज मिळाले?
व्हिडीओला ९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
या घटनेवर लोकांची काय प्रतिक्रिया आहे?
अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया देत नात्यांमधील विश्वासघातावर चिंता व्यक्त केली आहे.