स्वस्तात मस्त! अवघ्या ९ हजारात लाँच झाला शानदार स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स |Vivo Smartphone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivo Snartphone

Vivo Smartphone: स्वस्तात मस्त! अवघ्या ९ हजारात लाँच झाला शानदार स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

Vivo Y02 Launched: Vivo ने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y02 ला भारतात लाँच केले आहे. हा एक एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे. कंपनीच्या या ४जी स्मार्टफोनमध्ये ६.५१ इंच HD+ FullView स्क्रीन दिली आहे. याशिवाय, ऑक्टा-कोर मीडियाटेक प्रोसेसर, ५००० एमएएचची दमदार बॅटरी आणि ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा यासारखे फीचर्स तुम्हाला फोनमध्ये मिळतील.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

Vivo Y02 ची किंमत आणि उपलब्धता

Vivo Y02 ला कंपनीने एकमेव ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत फक्त ८,९९९ रुपये आहे. फोनला आर्किड ब्लू आणि कॉस्मिक ग्रे रंगात खरेदी करू शकता. फोनला विवोच्या ई-स्टोरसोबतच ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून देखील खरेदी करता येईल.

हेही वाचा: Social Media: फेसबुक, इंस्टाग्राम नव्हे तर, तरूणींच्या फोटोने झाला होता सोशल मीडियाचा 'श्री गणेशा'

Vivo Y02 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y02 हा Android 12 Go Edition आधारित Funtouch OS 12 वर काम करतो. फोनमध्ये ६.५१ इंचाचा HD+ FullView स्क्रीन दिली असून, याचा डिस्प्ले आय प्रोटेक्शन मोडसह येतो. कंपनीचा दावा आहे की, याद्वारे शानदार व्ह्यूइंग एक्सपीरियन्स मिळेल. सेल्फीसाठी वॉटरड्रॉप-स्टाइल कटआउट दिला आहे.

Vivo Y02 मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक चिपसेटचा सपोर्ट मिळतो. हा हीलियो पी२२ चिपसेट असण्याची शक्यता आहे. तसेच, ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. फोनच्या स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी देखील शानदार कॅमेरा मिळतो. यात रियरला ८ मेगापिक्सल आणि सेल्फी-व्हीडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कॅमेऱ्यात फेस ब्यूटी आणि टाइम लॅप्स फोटोग्राफीचा सपोर्ट दिला आहे. यात फेक वेक फीचर देखील दिले असून, याद्वारे फोनच्या फ्रंट कॅमेऱ्याचा वापर करून हँडसेटला अनलॉक करू शकता. यात १० वॉट वायर्ड आणि ५ वॉट रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते.

टॅग्स :Mobile Phone