Vi 5G : व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना कंपनीचं दिवाळी गिफ्ट, 5G सेवा केली सुरू; 'या' शहरांमध्ये उपलब्ध

5G सेवा सुरू केल्यामुळे कंपनीला नवसंजीवनी मिळते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Vi 5G Network
Vi 5G NetworkeSakal

व्होडाफोन-आयडिया, म्हणजेच व्ही कंपनीच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने दिल्ली आणि पुण्यामध्ये आपली 5G सेवा सुरू केली आहे. यामुळे आता जिओ आणि एअरटेलनंतर 5G सेवा उपलब्ध करणारी व्ही देशातील तिसरी कंपनी ठरली आहे.

कंपनीच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. यूजर्स 5G रेडी सिमकार्डच्या मदतीने 5G सेवेचा लाभ घेऊ शकतात. इंडिया मोबाईल काँग्रेस 2023 मध्येच कंपनीचे प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला यांनी 5G नेटवर्क सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता ही सेवा सुरू केल्याचं स्पष्ट झालं आहे.

Vi 5G Network
BSNL 5G : फेब्रुवारी 2024 पर्यंत बीएसएनएल सुरू करणार 5G नेटवर्कचं टेस्टिंग - रिपोर्ट

कंपनीला मिळणार संजीवनी?

व्होडाफोन आयडिया कंपनी मोठ्या तोट्यात आहे. कंपनीचा यूजरबेस दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यातच प्रतिस्पर्धी कंपन्यांनी 5G सेवा लाँच केल्यामुळे व्ही आणखीच मागे राहिलं होतं. आता 5G सेवा सुरू केल्यामुळे कंपनीला नवसंजीवनी मिळते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आपल्या यूजर्सना जोडून ठेवण्यासाठी व्ही कंपनी कित्येक नवनवीन प्लॅन्स लाँच करत आहे. कंपनीने भविष्यासाठी देखील मोठ्या योजना आखल्या आहेत. यावर्षीच्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये कंपनीने Vi C-DOT IoT लॅब, व्ही गेम्स, क्लाउड प्ले, व्हीआर गेम्स, एक्सआर एज्युटेक अशा गोष्टी सादर केल्या होत्या. यातील बहुतांश टेक हे 5G वर आधारित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com