
Vodafone idea VIP Mobile Number: आपला मोबाइल नंबर हटके असावा असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी लोकं हजारो रुपये खर्च करतात. तुम्हाला देखील हटके मोबाइल नंबर हवा असल्यास यासाठी सोपी पद्धत आहे. वोडाफोन आयडिया ग्राहकांना चक्क मोफत व्हीआयपी नंबर देत आहे. विशेष म्हणजे तुम्ही घरबसल्या संपूर्ण प्रोसेस पूर्ण करू शकता.
Vodafone Vanity Number खरेदी करण्याची प्रोसेस
Vodafone चा Vanity Number खरेदी करण्यासाठी तुम्हाला VI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर Pincode आणि Mobile Number टाका. आता VIP Fancy Number ची लिस्ट दिसेल. नंबर ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला ईमेल आयडी द्यावा लागेल.
शेवटी Proceed to checkout या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मोबाइल नंबर ऑर्डर करा. वोडाफोनची '99999....' ही सर्वात लोकप्रिय सीरिज आहे. काही व्हीआयपी नंबर तुम्हाला मोफत मिळतील. तर काही नंबरसाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. तुम्ही वोडाफोन आयडियाच्या स्टोरवर जाऊन देखील नंबर खरेदी करू शकता.
हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
Airtel VIP Number खरेदी करण्याची प्रोसेस
Airtel देखील VIP Number देत आहे. तुम्हाला एअरटेलचा व्हीआयपी नंबर सहज मिळेल. कंपनीचा व्हीआयपी नंबर खरेदी करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑर्डर करावी लागेल. आता नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला फोन येईल व एक फॉर्म भरण्यास सांगितला जातो. Airtel च्या व्हीआयपी नंबरसाठी तुम्हाला २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.