Instagram Hacks : आता इंस्टाग्रामचे व्हिडिओ सेव्ह करा कोणतेही थर्ड पार्टी अॅप्लिकेशन न वापरता... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Instagram Hacks

Instagram Hacks : आता इंस्टाग्रामचे व्हिडिओ सेव्ह करा कोणतेही थर्ड पार्टी अॅप्लिकेशन न वापरता...

Instagram Hacks : जे कोणी इंस्टाग्राम (Instagram) वापरते, त्यावरती वेगवेगळ्या स्टोरीज शेयर करत असते त्यांना एकच प्रॉब्लेम असतो आणि तो म्हणजे स्टोरी (Instagram Story) तर सेव्ह करता येते पण त्याचा ऑडिओ कधीच सेव्ह होत नाही आणि हे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्लिकेशनचा वापर करावा लागतो.

पण तुम्हाला माहिती आहे का की हे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोणत्याही ऑनलाइन वेबसाइट किंवा थर्ड पार्टी अॅप्लिकेशनची गरज नाही. फक्त या सोप्या टिप्स वापरुन तुम्ही आपली स्टोरी सेव्ह करु शकतात आणि दुसऱ्या सोशल मीडिया अकाऊंट जसे की व्हॉट्सअॅपवर शेयर करु शकतात.

बघूया हे कसं करायचं?

१. सर्वात आधी आपल्या अकाऊंटवरुन आपल्या हवी असलेली स्टोरी शेयर करा.

२. शेयर करतांना तिथे सेव्ह ड्राफ्ट (Save Draft) नावाचा ऑप्शन येतो त्यावर क्लिक करा आणि स्टोरी सेव्ह करुन घ्या.

३. आता कोणत्याही चॅटवर जा आणि तिथे कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करुन आपला सेव्ह केलेला व्हिडिओ सिलेक्ट करा.

४. आता त्याला हवं ते गाणं लावा आणि चॅटमध्ये पाठवून द्या.

५. आता तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या चॅट्स मध्ये दिसत असेल त्या व्हिडिओ वर लॉन्ग प्रेस करा आणि तो व्हिडिओ मोर (More) च्या ऑप्शनला क्लिक करुन सेव्ह करा.