
Gas Balloon Science : हवेत फुगे उडताना बघून लहान मुलांना फारच कौतुक वाटतं. आकाशाकडे उंचच उंच फुगे उडताना तुम्हीही बरेचदा बघितले असतील आणि तुम्ही हवेत फुगे सोडून ते किती दूरवर जातात याकडेसुद्धा कौतुकाने बघितलेच असेल. मात्र हे हवेत उडणारे फुगे काही वेळानंतर जातात तरी कुठे याची विचार तुम्ही कधी केलाय का?
तुम्हालाही असं वाटतं काय की फुगे दूरवर हवेत उडाल्यानंतर अवकाशात जातात म्हणून? त्यामागचं नेमकं कारण काय ते जाणून घेऊया. गॅसच्या फुग्यांमध्ये हेलियम गॅस भरलेली असते. ही गॅस वजनाने हलकी असल्या कारणाने हवेत फुगे वर वर उडतात.
पण, जसजसा हा गॅसचा फुगा आकाशात वर वर जातो तसतशी हवा पातळ होत जाते आणि एक वेळ अशी येते की फुग्यातील हवा आणि आकाशातील हवा समांतर असते तेव्हा फुगा हवेत वर जाणे बंद होतो. (Technology)
फुगा हवेत उडणे बंद होतो तेव्हा तो पृथ्वीपासून ३२ किलोमीटर उंचीवर असतो. या अंतरानंतर फुगा हवेत उडणे बंद होतो. अर्थात हा फुगा अवकाशापर्यंतची झेप घेत नाही.
फुगे हवेत एका स्पेसिफिक पॉइंटमध्ये गेल्यावर फुटतात. किंवा हवेत जास्त वर गेल्यावरही फुटतात. म्हणजेच एका वेळेनंतर फुगा हवेत फुटतो. (Science)
फुगा हवेत फुटण्याची अनेक कारणं असू शकतात. जसे की लो टेम्प्रेचर किंवा आणखी इतर कारणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.