What is Electronic Soil : अवघ्या 15 दिवसांमध्ये पिकाची होईल दुप्पट वाढ; 'इलेक्ट्रॉनिक माती'ची कमाल

याचा शोध ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करून लावण्यात आला होता. सध्या कित्येक ठिकाणी याचा वापर करून शेती केली जाते.
What is Electronic Soil
What is Electronic SoileSakal

What is Hydroponics : सध्याच्या डिजिटल जगामध्ये प्रत्येक गोष्टीला टेक्नॉलॉजीचा स्पर्श होतो आहे. शेतीमध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर करतच आहोत. मात्र स्वीडनमधील वैज्ञानिकांनी एक पाऊल पुढे जात चक्क इलेक्ट्रॉनिक माती (Electronic Soil) तयार केली आहे. ही माती म्हणजे खरंतर एक मिनरल न्यूट्रियंट सोल्यूशन आहे. यामध्ये पिकांची वाढ ही 50 टक्के अधिक होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

लिंकपिंग विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे. मिनरल न्यूट्रियंट सोल्यूशनमध्ये (Mineral Nutrient Solution) शेती करण्याच्या प्रक्रियेला हायड्रोपोनिक्स म्हटलं जातं. यामध्ये खरंतर मातीचा वापरच केला जात नाही. या सोल्यूशनमध्ये थेट पिकांची वाढ केली जाते. हे अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी वीजेचा वापर केला जातो, त्यामुळेच याला इलेक्ट्रॉनिक सॉईल असं म्हटलं जातं.

याचा शोध ग्लोबल वॉर्मिंगचा (Global Warming) विचार करून लावण्यात आला होता. सध्या कित्येक ठिकाणी याचा वापर करून शेती केली जाते. पिकांना पोषक तत्वं ही थेट मिनरल न्यूट्रियंट सोल्यूशनमधून देण्यात येतात. यासाठी पिकांना एका विशिष्ट प्रकारच्या सबस्ट्रेटवर लावलं जातं. या सबस्ट्रेटमध्ये वीज प्रवाहित करून त्याला अ‍ॅक्टिव्हेट केलं जातं. यामुळे रोपं झोपलेली असतानाही वेगाने मुळांमधून पोषक द्रव्ये त्यात शोषली जातात. यामुळे पिकांची वाढ वेगाने होते.

What is Electronic Soil
Scientists Talk To Whale : शास्त्रज्ञांनी चक्क व्हेलशी मारल्या गप्पा; आता एलियन्सशी संवाद साधताना होणार संशोधनाचा फायदा

15 दिवसांमध्ये 50 टक्के वाढ

जर्नल प्रोसिडिंग्स ऑफ दि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या नियतकालिकामध्ये याबाबत संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे, की इलेक्ट्रॉनिक मातीचा वापर केल्यामुळे पिकं अवघ्या 15 दिवसांमध्ये 50 टक्के अधिक वाढतात. मातीमध्ये लावलेल्या पिकांशी या वाढीच्या वेगाची तुलना करण्यात आली आहे.

जास्त जागेची देखील नाही गरज

या टेक्नॉलॉजीचा फायदा म्हणजे, यामध्ये शेती करण्यासाठी भरपूर जागेची आवश्यकता नाही. मातीचीच गरज नसल्यामुळे उभ्या टॉवर्समध्येही भाजीपाला पिकवला जाऊ शकतो. यामुळे एखाद्या छोट्या टेरेसवर देखील भरपूर प्रमाणात पीक घेतलं जाऊ शकतं.

What is Electronic Soil
NASA Cat Video : नासाने अंतराळातून पाठवला मांजराचा व्हिडिओ; मानवाला मंगळावर जाण्यासाठी होणार याची मदत

सध्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात जमीन नापिक होत चालली आहे. एकीकडे प्रदूषणावर नियंत्रण आणण्याची गरज असतानाच, दुसरीकडे पीक उत्पादनासाठी नवं तंत्रज्ञान शोधण्याची देखील गरज भासत आहे. अशा वेळी हे तंत्रज्ञान भविष्यात अगदी फायद्याचं ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com