Types of Cars : SUV, XUV, TUV आणि MUV यामध्ये काय असतो फरक? नवी कार घेण्यापूर्वी नक्की जाणून घ्या

Sports Utility Vehicle : 'एसयूव्ही'चा अर्थ स्पोर्ट्स युटिलिटी व्हीकल असा होतो. या गाड्यांमध्ये अगदी पॉवरफुल इंजिन दिलेलं असतं.
SUV, XUV, TUV Difference
SUV, XUV, TUV DifferenceeSakal

Types of Cars : वाहन निर्मिती कंपन्या विविध सेगमेंटमध्ये आपल्या गाड्या लाँच करत असतात. बाजारात XUV, SUV अशा गाड्यांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. कित्येक जणांना हे दोन्ही प्रकार एकच वाटतात. मात्र, या दोन्हींच्या केवळ नावातच नाही, तर गाडीच्या प्रकारातही बरीच तफावत आहेत. यासोबतच TUV आणि MUV असेही गाड्यांचे प्रकार असतात.

हे प्रकार काय आहेत, या नावांचे लाँग फॉर्म काय आहेत आणि यांमध्ये काय फरक आहे याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. जेणेकरुन भविष्यात तुम्हालाही केवळ गाडीचं नाव ऐकून ती कोणत्या प्रकारातील गाडी आहे याचा अंदाज येईल.

SUV

'एसयूव्ही'चा अर्थ स्पोर्ट्स युटिलिटी व्हीकल (Sports Utility Vehicle) असा होतो. या गाड्यांमध्ये अगदी पॉवरफुल इंजिन दिलेलं असतं. विशेषतः ऑफरोडिंगसाठी या कार्स ओळखल्या जातात. SUV मध्येही विविध प्रकार असतात.

गाडीच्या आकारानुसार हे प्रकार ठरतात. फुल साईज, कॉम्पॅक्ट आणि मिड साईज असे तीन प्रकार यात असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास, फॉर्च्युनर ही एक फुल साईज एसयूव्ही आहे. ब्रीझा ही एक सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे, तर क्रेटा ही एक मिड साईज एसयूव्ही आहे.

SUV, XUV, TUV Difference
BYD Seal : भारतात लाँच झाली नवी इलेक्ट्रिक कार; 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये धावणार तब्बल 200 किलोमीटर

MUV

'एमयूव्ही'चा अर्थ मल्टी युटिलिटी व्हीकल (Multi Utility Vehicle) असा होतो. नावातच दिल्याप्रमाणे ही गाडी ऑन-रोड, ऑफ-रोडिंग आणि इतर गोष्टींसाठी देखील वापरता येते. एमयूव्ही गाड्यांचा ऑन-रोड परफॉर्मन्स अगदी चांगला असतो.

TUV

टीयूव्हीचा अर्थ टफ युटिलिटी व्हीकल (Tough Utility Vehicle) असा असतो. या गाड्यांमध्ये SUV सारखे फीचर्स असतात. मात्र तुलनेने ही कार लहान आकाराची असते. त्यामुळे बऱ्याचदा टीयूव्ही गाड्यांना मिनी-एसयूव्ही (Mini-SUV) असं देखील म्हटलं जातं.

SUV, XUV, TUV Difference
Xiaomi Car : 'अ‍ॅपल'च्या प्रोजेक्टला ब्रेक, पण श्याओमीने मारली बाजी! सादर केली 800 किलोमीटर रेंजची इलेक्ट्रिक कार..

XUV

एक्सयूव्ही हे नाव आणि त्याचा फुल-फॉर्म थोडा वेगळा आहे. XUV म्हणजे क्रॉसओव्हर युटिलिटी व्हीकल्स. (Crossover Utility Vehicles) यामध्ये तुम्ही Mahindra XUV300, Mahindra XUV500 अशा गाड्या पाहिल्या असतील. क्रॉसओव्हर व्हीकलमध्ये MUV सारखीच भरपूर स्पेस मिळते आणि या गाड्या SUV प्रमाणे ऑफ-रोड देखील चालवता येतात. त्यामुळे यांना 'क्रॉसओव्हर' व्हीकल म्हटलं जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com