Xiaomi Car : 'अ‍ॅपल'च्या प्रोजेक्टला ब्रेक, पण श्याओमीने मारली बाजी! सादर केली 800 किलोमीटर रेंजची इलेक्ट्रिक कार..

MWC 2024 : बार्सिलोनामध्ये होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये या कारची झलक पहायला मिळाली.
Xiaomi SU7
Xiaomi SU7eSakal

Xiaomi electric Car with 800 km range : अगदी भन्नाट आणि युनिक प्रॉडक्ट बनवण्यासाठी अ‍ॅपल कंपनी जगात प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी अ‍ॅपलने चक्क इलेक्ट्रिक कार बनवण्याची देखील घोषणा केली होती. मात्र नंतर हा प्रोजेक्ट गुंडाळण्यात आला. दरम्यान चिनी मोबाईल कंपनी श्याओमीने मात्र आपली इलेक्ट्रिक कार सादर करुन अ‍ॅपलला मात दिली आहे. बार्सिलोनामध्ये होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये या कारची झलक पहायला मिळाली.

Xiaomi SU7 असं या गाडीचं नाव आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात ही गाडी चीनमध्ये सादर करण्यात आली होती. त्यानंतर MWC 2024 मध्ये ही ग्लोबल प्लॅटफॉर्मवर सादर करण्यात आली. ही कार दिसायला बऱ्याच प्रमाणात पोर्श (Porsche) कंपनीच्या गाड्यांप्रमाणे आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये तब्बल 800 किलोमीटर धावू शकते असा दावा कंपनीने केला आहे.

श्याओमीची ही इलेक्ट्रिक कार सेडान प्रकारात येते. याचा व्हीलबेस 3000 mm आहे. या कारला कंपनीने दोन बॅटरी व्हेरियंटसोबत सादर केलं आहे. तसंच, यामध्ये तीन कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. Xiaomi SU7 यातील 'SU'चा अर्थ Speed Ultra असा आहे. या गाडीचा टॉप स्पीड 265 kmph एवढा आहे. बेस व्हेरियंटचा टॉप स्पीड 210kmph आहे.

Xiaomi SU7
MWC 2024 Updates : सॅमसंगची स्मार्ट रिंग, वनप्लसची स्मार्टवॉच अन् ओप्पोचे स्मार्ट ग्लासेस.. टेक इव्हेंटमध्ये काय काय झालं लाँच?

या कारमध्ये 73.6 kwh बॅटरीपॅक देण्यात आलाय. टॉप व्हेरियंटमध्ये 101 kwh एवढी मोठी बॅटरी मिळते. कंपनीने यामध्ये CTB (Cell to Body) टेक्नोलॉजीचा वापर केल्याचं म्हटलं आहे. या गाडीमध्ये क्रूज कंट्रोल, पार्किंग असिस्टंट, एंटरटेन्मेंट सिस्टीम, 25 स्पीकर सिस्टम, सेल्फ पार्किंग, HD कॅमेरा, अल्ट्रासॉनिक, रडार असे कित्येक अत्याधुनिक फीचर्स मिळतात.

किंमत अन् लाँच

या गाडीची लाँच डेट अद्याप कंपनीने जाहीर केली नाही. जेव्हा कारचं अधिकृत लाँचिंग होईल, तेव्हाच किंमत जाहीर करण्यात येईल. दरम्यान, श्याओमीने आताच आपल्या दुसऱ्या कारची घोषणा देखील केली आहे. कंपनी 2025 साली नवी कार लाँच करेल. या कारची रेंज तब्बल 1200 किलोमीटर असेल असा दावा कंपनीने केला आहे.

Xiaomi SU7
Tecno Robot Dog at MWC : टेक्नोने सादर केला चक्क रोबोट डॉग.. सोबतच लाँच केले स्मार्टफोन अन् 'गेमिंग एआर'; पाहा व्हिडिओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com