
फक्त महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या टी अॅपचा मोठा डेटा लीक झाला आहे.
72,000 फोटो व पुरुषांवरील रिव्यू इंटरनेटवर खुलेआम उपलब्ध झाली आहेत.
कंपनीचा दावा असला तरी वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर मोठा धोका निर्माण झाला आहे.
स्त्रियांनी चालवलेले आणि फक्त स्त्रियांसाठी असलेले टी अॅप सध्या मोठ्या चर्चेत आहे तेही एका भयंकर डेटा लीकमुळे. या लीकमुळे हजारो वापरकर्त्यांची खाजगी माहिती, फोटो आणि पुरुषांविषयीच्या रिव्यूचा डेटा इंटरनेटवर खुलेआम फिरत आहे. हे अॅप जेथे स्त्रिया पुरुषांना डेटिंग अनुभव, वर्तन आणि निष्ठेच्या आधारावर रेट करतात, तेथेच आता गोपनीयता धोक्यात आली आहे.
टी अॅप (TEA App) हे एक खास अॅप आहे जे फक्त महिलांसाठी तयार करण्यात आले आहे. या अॅपवर महिला त्यांनी भेटलेल्या किंवा डेट केलेल्या पुरुषांना विविध निकषांवर रेटिंग देतात आणि त्यांच्या अनुभवांबद्दल पुनरावलोकन लिहितात. 'टी स्पिल' या विभागात त्या आपले अनुभव इतर महिलांशी शेअर करतात, ज्यामुळे इतर महिलांना संबंधित पुरुषाविषयी निर्णय घेणे सोपे होते.
उदाहरणार्थ, एखादा पुरुष विश्वासार्ह आहे का, तो केवळ वेळ घालवतोय का, की त्याच्याशी दीर्घकालीन संबंध ठेवावेत अशा बाबी या रेटिंग्समधून समजतात.
सध्या या अॅपवर एक मोठा सायबर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. 404 मीडियाने सर्वप्रथम या लीकबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार,
72,000 पेक्षा अधिक फोटो लीक झाले,
यामध्ये 13,000 सेल्फी आणि ओळख पटवण्यासाठी वापरलेले फोटो आयडी आहेत,
59,000 हून अधिक फोटो, जे कमेंट्स, पोस्ट्स किंवा डीएम्समध्ये होते, तेही अॅक्सेस करता येणारे झाले,
वापरकर्त्यांची नावे, प्रोफाईल्स, ईमेल्स, आणि पुरुषांचे रेटिंग्ज आणि रिव्यूही लीक झाली आहेत.
ही माहिती थर्ड पार्टी क्लाउड सर्व्हरवरून उघड झाल्याचे समजते. विशेष म्हणजे हा डेटाबेस 4chan या फोरमवर पोस्ट करण्यात आला आहे, जिथून कोणीही ते डाऊनलोड करू शकतो.
टी अॅपने एका अधिकृत निवेदनात सांगितले आहे की, फक्त फेब्रुवारी 2024 पूर्वी साइन अप केलेल्या वापरकर्त्यांवर याचा परिणाम झाला आहे. कंपनीनुसार ईमेल आयडी किंवा फोन नंबर लीक झालेले नाहीत, मात्र इतर संवेदनशील माहिती लीक झाल्यामुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर मोठा आघात झाला आहे.
अलिकडच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार, टी अॅपवर 40 लाखांहून अधिक महिला वापरकर्त्या नोंदणीकृत आहेत. डेटिंग सीनमध्ये विश्वासार्हता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी या अॅपला पसंती मिळत होती, परंतु आता डेटा लीकनंतर विश्वासाचा मोठा धक्का बसला आहे.
डेटा लीक झाल्यानंतर वापरकर्त्यांनी आपले अॅप पासवर्ड अपडेट करावेत आणि प्रोफाईलमधील संवेदनशील माहिती हटवावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
1.What is the TEA App?
टी अॅप म्हणजे काय?
टी अॅप हे एक खास महिलांसाठी बनवलेले अॅप आहे, जिथे त्या पुरुषांना डेटिंग वर्तनाच्या आधारावर रेट करतात व रिव्यू करतात.
2.Why is the TEA App in the news?
टी अॅप सध्या चर्चेत का आहे?
टी अॅपमधील 72,000 फोटो आणि संवेदनशील माहिती लीक झाल्यामुळे हे अॅप चर्चेत आहे.
3.What kind of data was leaked from the TEA App?
टी अॅपमधून कोणती माहिती लीक झाली?
वापरकर्त्यांचे फोटो, रिव्यू , प्रोफाइल तपशील आणि ओळखपत्राचे फोटो लीक झाले आहेत.
4.Is user contact information also leaked?
वापरकर्त्यांचा ईमेल किंवा फोन नंबर लीक झाला आहे का?
कंपनीनुसार, ईमेल आणि फोन नंबर लीक झाले नाहीत.
5.Who is affected by this leak?
या डेटा लीकमुळे कोण प्रभावित झाले आहेत?
फेब्रुवारी 2024 पूर्वी साइन अप केलेले वापरकर्ते या लीकला बळी ठरले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.