esakal | वर्क फ्रॉम होम करतायं,तुमच्यासाठी बेस्ट रिचार्ज प्लॅन कोणता?
sakal

बोलून बातमी शोधा

वर्क फ्रॉम होम करताय,तुमच्यासाठी बेस्ट रिचार्ज प्लॅन कोणता?

वर्क फ्रॉम होम करताय,तुमच्यासाठी बेस्ट रिचार्ज प्लॅन कोणता?

sakal_logo
By
शरयू काकडे

देशात कोरोना विषाणुच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये जास्त प्रादुर्भाव झाल्याचे दिसते. दिल्लीसह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लॉकडाऊन जारी केला आहे. त्यामुळे सराकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरातूनच काम करावे लागत आहे. वर्क फ्रॉम होम करण्यासाठी कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून, सर्वांना चांगला आणि पुरेल इतका डेटा पॅकची आवश्यकता असते.(what is the best recharge plan for you for Work from home VI Airtel Jio)

वर्क फ्रॉम होम करण्यासाठी 3 जीबी डेटा रिचार्ज पुरेसा असतो. रिलायन्स जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलचे कोणते प्रिपेड प्लॅनमध्ये आपल्याला 3 जीबी डेटा मिळेल हे जाणून घेऊ या.

हेही वाचा: वेब ब्राऊजिंगची सुरुवात करणारं ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ अखेरच्या घटका का मोजतंय?

रिलायन्स जिओ (Reliance Jio)

401 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 3 जीबी डेटा सोबतच 6 जीबी जास्तीचा डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये रोज 100 SMS देखील मिळतात आणि अनलिमिटेड व्हाईल कॉलही उपलब्ध आहेत. या प्लॅनमुळे तुम्हाला हॉटस्टार, जिओ टिव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्युज आणि जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेसही मिळतो

999 रुपयांचा प्लॅन : जिओच्या या प्लॅनची वैधता 84 दिवसांची असून त्यामध्ये रोज 3 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS चा लाभ घेता येतो तसेच, अनलिमिटेड व्हाईस कॉल देखील करता येतात. या प्लॅनमुळे तुम्हाला जिओ टिव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्युज आणि जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेसही मिळतो.

349 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनची वैधता 28 दिवसांची वैधता असून 3 जीबी डेटा मिळतो. त्यासोबतच अनलिमिटेड व्हाईस कॉल आणि रोज 100 SMS चा फायदाही मिळतो. या प्लॅनमुळे तुम्हाला जिओ टिव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्युज आणि जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेसही मिळतो.

हेही वाचा: आता तुमचा स्मार्टफोन होणार अवघ्या ८ मिनिटांमध्ये फुल चार्ज

एअरटेल (Airtel)

558 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये रोज 3 जीबी डेटा मिळत असून 56 दिवसांची वैधता आहे. यामध्ये रोज 100 SMS मिळणार असून अनलिमिटेड व्हॉईस कॉलही करता येणार आहे.

398 रुपयांचा प्लॅन : एअरलटेलच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता असून 3 जीबी डेटा रोज मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 100 SMS चा फायदा देखील मिळणार आहे.

448 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून 3 जीबी डेटा मिळणार आहे. त्यासोबतच अनलिमिटेडट व्हाईस कॉल आणि रोज 100 SMS चा लाभ घेता येणार आहे.

हेही वाचा: १ जूनपासून Google Photos मध्ये होणार मोठा बदल

वोडाफोन आयडिया (Vodafone Idea)

801 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटासोबत 48 जीबी एक्स्ट्रा मिळणार आहे. प्लॅनची वैधता 84 दिवसांची वैधता आहे. त्यामध्ये 100 SMS रोज मिळणार आहे. अनलिमिटेड व्हॉईस कॉलचा देखील लाभ घेता येणार आहे. तसेच या प्लॅनवर तुम्हाला डिजनी प्लस हॉटस्टार आणि Vi Moviesचा देखील अॅक्सेस मिळणार आहे.

401 रुपयांचा प्लॅन : वोडाफोन आयडयाच्या या प्लॅमनध्ये 28 दिवसांच्या वैधता असून, रोज 3 जीबी डेटासह 16 जीबी एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. प्लॅनमध्ये रोज 100 SMSचा फायदा मिळणार आहे. जीओ प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल करता येणार आहे. या डिजनी प्लस हॉटस्टार आणि Vi Moviesचा 1 वर्षाचा अॅक्सेस मिळणार आहे.

558 रुपयांचा प्लॅन :वोडाफोन- आयाडियाच्या या प्लॅनवर 56 दिवसांची वैधता असून रोज 3 जीबी डेटा मिळणार आहे. तसेट अनलिमिडेट व्हॉईस कॉलसह रोज 100 SMS देखील करता येणार आहे.

398 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये रोज 3जीबी डेटा मिळणार असून 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यामध्ये अनलिमिडेट व्हॉईस कॉलचा फायदा होणार असून दररोज 100 SMS देखील मिळणार आहेत. Vi Movies अॅक्सेसचा तुम्हाला एक्स्ट्रा फायदा मिळणार आहे.