esakal | हॉटस्पॉट वापरल्याने खराब होते मोबाईलची बॅटरी? जाणून घ्या तोटे
sakal

बोलून बातमी शोधा

हॉटस्पॉट वापरल्याने खराब होते मोबाईलची बॅटरी? जाणून घ्या तोटे

हॉटस्पॉट वापरल्याने खराब होते मोबाईलची बॅटरी? जाणून घ्या तोटे

sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशात लॉकडाउन सुरु झाल्यापासून अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यातच घरुन काम करतांना लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट. त्यामुळे या काळात वायफाय आणि इंटरनेटची मागणी तुफान वाढली आहे. परंतु, अनेकदा नेटवर्क इश्शूमुळे किंवा वायफायवर लोड आल्यामुळे नेट म्हणावं तितकी साथ देत नाही. अनेकदा मिटींग सुरु असतांना अचानक वायफाय बंद पडतं. त्यामुळे सहाजिकच वायफायला पर्याय म्हणून आपण मोबाईल हॉटस्पॉट वापरतो. विशेष म्हणजे मोबाईल हॉटस्पॉट वापरणं आता कॉमन झालं आहे. परंतु, सतत हॉटस्पॉट वापरणं नुकसानकारक ठरु शकतं. म्हणूनच, हॉटस्पॉट वापरण्याचे तोटे कोणते ते पाहुयात. (what-is-the-losses-of-using-mobile-hotspot)

हेही वाचा: स्कूल बसचा रंग ‘पिवळा’ च का?

BSNL's internet hotspot Sindhudurg soon

BSNL's internet hotspot Sindhudurg soon

१. हॉटस्पॉट वापरल्यामुळे मोबाईल डेटा लवकर संपतो असा अनेकांचा समज आहे. परंतु, केवळ डेटाच संपत नाही. तर, त्यासोबत मोबाईलची बॅटरीही खराब होते.

२. हॉटस्पॉट वापरत असतांना फोनमध्ये सुरु असलेले इतर अॅप बंद करा. या अॅपमुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे फोन सतत चार्ज करावा लागतो.

३. हॉटस्पॉट सतत वापरल्यामुळे त्याचा स्पीड ठराविक वेळेनंतर कमी होतो. त्यामुळे जिथे नेटवर्क जास्त चांगल असेल अशाच ठिकाणी हॉटस्पॉट वापरा.

४. हॉटस्पॉटला कायम पासवर्ड ठेवा. नाही तर इतर लोक तुमच्या हॉटस्पॉटला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतील.

५. एक हॉटस्पॉट दोन पेक्षा जास्त वेळ वापरु नका.