मायक्रोसॉफ्टकडून नवा ब्रॉऊझर लाँच; वाचा काय असतील फिचर्स

टीम ई-सकाळ
Saturday, 23 May 2020

या नव्या ब्रॉऊझरमध्ये मायक्रोसॉफ्टकडून अनेक नव्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना ब्रॉऊझिंगचा अधिक चांगला अनुभव घेता येणार आहे. मायक्रोसॉफ्ट एज ब्रॉऊझरमध्ये पिंटरेस्ट इंटेग्रेशन आणि नवीन स्लाईड बारची सुविधा सामाविष्ट करण्यात आली आहे. 

मुंबई : मायक्रोसॉफ्टकडून आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन ब्रॉऊझर लाँच करण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्टने नुकतीच याची घोषणा केली असून हे ब्रॉऊझर येत्या काही दिवसात सर्वांना उपलब्ध होणार आहे. मायक्रोसॉफ्ट एज (Version 83.0.478.37) असे नव्या ब्रॉऊझरचे नाव आहे. या नव्या ब्रॉऊझरमध्ये मायक्रोसॉफ्टकडून अनेक नव्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना ब्रॉऊझिंगचा अधिक चांगला अनुभव घेता येणार आहे. मायक्रोसॉफ्ट एज ब्रॉऊझरमध्ये पिंटरेस्ट इंटेग्रेशन आणि नवीन स्लाईड बारची सुविधा सामाविष्ट करण्यात आली आहे. 

दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत मेच्या  अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या

- नवीन स्लाईड बारचा पर्याय उपलब्ध झाल्याने वापरकर्त्यांना ब्रॉऊझिंगचा चांगला अनुभव मिळेल. या नव्या स्लाईड बारमध्ये वर्तमान टॅब न सोडता आपल्याला दुसरा टॅब उघडता येणार आहे. तसेच वेगवेगळे सर्च रिझल्ट आपण पेजच्या एका बाजूला पाहू शकणार आहोत.

- मायक्रोसॉफ्ट एजच्या नव्या वर्जनमध्ये सुधारित सिंकिंग( extension syncing) सपोर्ट करणारं आहे. त्यामुळे प्रत्येक नव्या डिवाईसमध्ये लॉग ईन करताना तुम्हाला मॅन्यूअली ब्रॉऊझर री-इंस्टॉल करण्याची गरज असणार नाही. 

- ऑटोमॅटिकरित्या क्लिअर होणाऱ्या काही कुकीज(cookies) आता तुम्हाला तशाच ठेवता येणार आहेत. (याचा फायदा तुम्हाला ब्रॉऊझर बंद केल्यानंतरही काही ठराविक वेबसाईटमध्ये लॉग इन राहण्यासाठी होणार आहे)

कर्नाटक राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका वेळेत घ्या; विरोधी पक्षाची मागणी

- तुम्ही एकाचवेळी अनेक प्रोफाईल वापरता. काही साईट तुम्हाला अधिकृत प्रोफाईल देण्यास सांगतात. यावेळी मायक्रोसॉफ्ट एज ब्रॉऊझर तुम्हाला त्याबाबत सूचना देणार आहे. तसेच प्रोफाईल बदलण्यास तुम्हाला तत्पर करणार आहे. 

- नवीन ब्रॉऊझरमध्ये रिडायरेक्ट लोडिंग टाळली जाणार आहे. तसेच मॅलेसियस साईट ब्रॉऊझरकडून ऑटोमॅटिक ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे मॅलेसियस साईटमुळे होणारा डिस्टर्बन्स रोखला जाईल.

दरम्यान, मायक्रोसॉफ्ट एज ब्रॉऊझरमध्ये अनेक नव्या फिचर्संचा समावेश करण्यात आला आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती आणि फिचर्स वापरण्याबाबतच्या सूचना मायक्रोसॉफ्टने आपल्या वेबसाईटवर दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Whats New in Microsofts Edge Browser