अलर्ट! व्हॉट्सअ‍ॅप वर सुरु आहे ‘फ्रेंड इन नीड’ स्कॅम; वाचा सविस्तर | WhatsApp Friend in Need Scam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Friend in Need Scam

अलर्ट! व्हॉट्सअ‍ॅप वर सुरु आहे ‘फ्रेंड इन नीड’ स्कॅम; वाचा सविस्तर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

Friend in Need Scam : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp हे जगात सर्वत्र वापरले जाते, याचाच फायदा घेत फसवणूक केल्याचे अनेक प्रकार घडतात. लोकांची फसवणूक करण्यासाठी या अ‍ॅपचा सर्रास वापर केला जातो. इतर सोशल मीडिया अ‍ॅप्सच्या तुलनेत व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात सर्वाधिक वापरकर्ते आहेत, अनेकजण त्यांच्या कामासंदर्भात देखील हे अ‍ॅप वापरतात. दरम्यान आज आपण या अ‍ॅपवर सुरु असलेल्या एका फ्रॉड बद्दल जाणून घेणार आहोत. याचे नाव "फ्रेंड इन नीड" असून अनेक वापरकर्त्यांना त्यांच्या मित्रांकडून त्यांच्या मदतीची गरज असल्याचे मेसेज पाठवले जात आहेत. यूकेमध्ये, बहुतेक वापरकर्त्यांना हा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर मिळत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू असलेला ‘फ्रेंड इन नीड’ स्कॅम काय आहे?

तुमच्या मित्र असल्याचा बनाव करुन तुमच्याकडे मदत मागून फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. व्हॉट्सअॅपवर वापरकर्त्यांना मित्रांकडून मेसेज आले आहेत की ते परदेशात अडकले आहेत आणि घरी जाण्यासाठी त्यांना पैशांची गरज आहे. यूकेच्या नॅशनल ट्रेडिंग स्टँडर्ड्सनुसार, यूकेमध्ये राहणाऱ्या ५९ टक्के लोकांना असे स्कॅम मेसेज मिळाले आहेत. व्हॉट्सअॅपने "फ्रेंड इन नीड" घोटाळ्याची कबुली दिली आहे आणि वापरकर्त्यांना सतर्क केले आहे. नॅशनल ट्रेडिंग स्टँडर्ड्स स्कॅम टीमचे प्रमुख लुईस बॅक्स्टर म्हणाले, "स्कॅमर वैयक्तिक माहिती, पैसे किंवा सहा-अंकी पिन विचारण्यासाठी मित्र किंवा कुटुंबातील सदस्याकडून आलेले संदेश पाठवतात."

हेही वाचा: मारुतीची नवीन Brezza; सनरूफ, नव्या इंटीरियरसह मिळतील अनेक फीचर्स

‘फ्रेंड इन नीड’ स्कॅम कसा चालतो?

सायबर सुरक्षा तज्ञांच्या मते, स्कॅमर तुमच्या मित्राचा किंवा कुटुंबाचा नंबर कसा अॅक्सेस करतात असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर, हॅक झालेल्या अकाउंट्स, नंबर्सवरून मेसेज पाठवले जातात. असे संदेश हॅक झालेल्या नंबरवरून किंवा मित्राच्या अकाऊंटवरुन पाठवले जातात. जर तुमच्या मित्राचा फोन हरवला असेल, तर त्याचा फोनमधील कॉन्टॅक्ट्स वापरुन, स्कॅमर त्यांना असे मेसेज पाठवण्याची शक्यता असते.

अशा स्कॅमपासबव स्वतःचे रक्षण कसे कराल?

तुम्हाला तुमच्या मित्राकडून पैसे मागणारा मेसेज आला, तर लगेच पैसे पाठवण्याऐवजी त्यांना फोनवर कॉल करा. अशा कोणत्याही मेसेजला प्रतिसाद देण्यापूर्वी नेहमी त्याचा सोर्स तपासा. तसेच, अशा संशयास्पद मेसेज मध्ये स्कॅमर वापरत असलेल्या भाषेकडे निट लक्ष द्या.

हेही वाचा: सिंगल चार्जवर 'या' इलेक्ट्रिक कार धावतात 450 किमी

loading image
go to top