व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना झटका, आता चॅट बॅकअपसाठी द्यावे लागणार पैसे | WhatsApp Backup | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp backup on google drive android may get limited storage in future check details

व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना झटका, आता चॅट बॅकअपसाठी द्यावे लागणार पैसे

WhatsApp Backup on Google Drive : मेटा (फेसबुक) च्या मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप (WhatsApp) सध्या जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग ॲपपैकी एक आहे. जगभरात त्याच्या वापरकर्त्यांची संख्या दोन अब्जांपेक्षा जास्त आहे. व्हॉट्सॲप कडून आपल्या वापरकर्त्यांना चॅट बॅकअपची सुविधा देण्यात येते, जरी सुरुवातीला हे चॅट बॅकअप एंड-टू-एंड एनक्रिप्टेड नव्हते, परंतु गेल्या वर्षी व्हॉट्सॲपने सांगितले की, चॅट्सचा थर्ड पार्टी बॅकअप देखील एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असेल म्हणजेच Google ड्राइव्ह किंवा आयक्लॉड पण चॅट्स बॅकअप घेण्यासाठी एंड-टू-एंड एनक्रिप्ट केलेले आहेत.

Android वापरकर्ते सहसा त्यांच्या WhatsApp चॅटचा Google Drive वर बॅकअप घेतात. तुमच्या माहितीसाठी, Google Drive वरही तुमचे चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असते. आता गुगल व्हॉट्सॲप यूजर्सना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे..

अनलिमीटेड स्टोरेज मिळणार नाही

रिपोर्टनुसार Google आता WhatsApp वापरकर्त्यांच्या चॅट बॅकअपसाठी Google Drive मध्ये अमर्यादित स्टोरेज देणार नाही. व्हॉट्सॲपच्या फीचर्सची माहिती देणाऱ्या wabetainfo च्या रिपोर्टनुसार Google लवकरच चॅट बॅकअपसाठी अमर्यादित स्टोरेजचे फीचर बंद करणार आहे, अद्याप Google किंवा WhatsApp कडून याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाही.

हेही वाचा: ड्रायव्हिंग लायसन्स, RC घरी विसरलात? फोन वाचवेल तुमचा दंड

सध्या, वापरकर्त्यांना Gmail सह एकूण 15 GB फ्री स्टोरेज मिळते, ज्यामध्ये ड्राइव्हचे स्टोरेज देखील समाविष्ट आहे. जर हा रिपोर्ट खरा ठरला, तर वापरकर्त्यांना त्यांच्या WhatsApp चॅटचा बॅकअप घेण्यासाठी स्टोरेज देखील खरेदी करावे लागेल. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला, Google ने Google Photos साठी अमर्यादित स्टोरेज देखील बंद केले आहे.

हेही वाचा: वाहनात CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, 'या' गाड्यांना मिळणार परवानगी

Web Title: Whatsapp Backup On Google Drive Android May Get Limited Storage In Future Check Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top