Vivo T4 Mobile : भारतात लॉन्च झाला Vivo T4 मोबाईल; सुपरफास्ट चार्जिंग अन् दमदार फीचर्स, किंमत फक्त...

Vivo T4 Smartphone Launch Features Price : नवीन Vivo T4 स्मार्टफोन भारतात उपलब्ध झाला आहे.यामध्ये 7,300mAh बॅटरी, 90W चार्जिंग, आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो.
Vivo T4 Smartphone Launch Features Price
Vivo T4 Smartphone Launch Features Priceesakal
Updated on

Vivo T4 Smartphone Price : स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. विवोने आपल्या लोकप्रिय T सीरिजमधील नविन स्मार्टफोन Vivo T4 भारतात अधिकृतपणे सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रीमियम फीचर्सचा समावेश असून त्याची किंमत केवळ 21,999 रुपयेपासून सुरू होते. 29 एप्रिलपासून Flipkart, Vivo India च्या अधिकृत वेबसाइटवर तसेच निवडक ऑफलाइन स्टोअर्सवर याची विक्री सुरू होणार आहे.

स्टायलिश डिझाईन आणि दमदार डिस्प्ले

Vivo T4 मध्ये आकर्षक quad-curved AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो 6.77-इंचांचा असून फुल HD+ रिझोल्यूशन (1080 x 2392 pixels) सह येतो. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000 निट्स पीक ब्राइटनेस आहे, ज्यामुळे उन्हातही स्क्रीन स्पष्टपणे दिसतो. फोनला IP65 रेटिंग मिळालेली आहे, म्हणजेच तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे.

भारी बॅटरी आणि झपाट्याने चार्जिंग

हा फोन 7,300mAh क्षमतेच्या बॅटरीने सुसज्ज आहे जी 90W फ्लॅशचार्ज तंत्रज्ञानासह येते. विशेष म्हणजे यामध्ये वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे. त्यामुळे तुम्ही इतर डिव्हाइसही याच्या मदतीने चार्ज करू शकता.

Vivo T4 Smartphone Launch Features Price
ChatGPT Aadhaar : अलर्ट! AI वापरुन बनवले जात आहेत बनावट आधार कार्ड, तुमचे ID डॉक्युमेंट कसे ठेवाल सुरक्षित? जाणून घ्या सोपी ट्रिक

फोटोग्राफीसाठी उत्तम पर्याय

Vivo T4 मध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा (OIS सह) आणि 2MP सेन्सर असलेले ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8MP फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

शक्तिशाली परफॉर्मन्स

हा स्मार्टफोन Snapdragon 7s Gen 3 (4nm) चिपसेट वर चालतो, जो दमदार आणि ऊर्जा कार्यक्षम आहे. यामध्ये 8GB ते 12GB RAM आणि 128GB ते 256GB स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. ऑपरेटिंग सिस्टम म्हणून यात Android 15 वर आधारित Funtouch OS 15 वापरण्यात आले आहे.

Vivo T4 Smartphone Launch Features Price
Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये भन्नाट फीचरची एंट्री; कसं वापरायचं? एकदा बघाच

सिक्युरिटी आणि कनेक्टिव्हिटी

फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth 5.2, GPS, OTG सपोर्ट आणि USB Type-C पोर्ट दिलेले आहेत. फोनचे दोन रंग पर्याय, Emerald Blaze आणि Phantom Grey, आकर्षक आणि प्रीमियम लूक देतात.

किंमत आणि ऑफर

व्हेरियंट - 8GB + 128GB किंमत - 21,999 रुपये

व्हेरियंट - 8GB + 256GB किंमत - 23,999 रुपये

व्हेरियंट - 12GB + 256GB किंमत - 25,999 रुपये

Vivo T4 Smartphone Launch Features Price
Gmail Scam : एक ईमेल अन् मिनिटांत बँक अकाऊंट रिकामं! काय आहे हा Gmail फ्रॉड? आत्ताच जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान

या किंमतीवर ग्राहकांना 2,000 रुपयेपर्यंत बँक डिस्काउंट देखील मिळणार आहे, ज्यामुळे ही डील अधिकच फायद्याची ठरणार आहे.

Vivo T4 हा स्मार्टफोन त्याच्या स्टायलिश लूक, प्रीमियम फीचर आणि परवडणारी किंमतीमुळे भारतात चांगलीच लोकप्रियता मिळवण्याची शक्यता आहे. तुम्ही जर नवीन फोन खरेदीचा विचार करत असाल, तर Vivo T4 हा एक परिपूर्ण पर्याय ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com