esakal | WhatsApp चं भन्नाट फिचर; एकदा पाहिल्यानंतर व्हिडिओ-फोटो होणार डिलीट
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp

WhatsApp चं भन्नाट फिचर; एकदा पाहिल्यानंतर व्हिडिओ-फोटो होणार डिलीट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आजकाल आपण सगळेच जण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. एखाद्याशी गप्पा मारण्यासाठी किंवा फोटो आणि व्हिडिओ शेयर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरले जाते. इतकेच नाही तर व्हॉईस कॉलपासून व्हिडिओ कॉलिंगपर्यंत, व्हॉट्सअ‍ॅपने सगळं काही सोपं केले आहे. व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या वापरकर्त्यांच्या गरजेनुसार अनेक फीचर्स अपडेट करत राहते. नुकतेच WhatsApp ने भन्नट फीचर्स आणलं आहे. या फिचरमुळे एकदा पाहिल्यानंतर व्हिडिओ अथवा फोटो डिलिट होणार आहे. या फिचरचं नाव ‘व्ह्यू वन्स’ असं आहे. हे फिचर सर्व व्हॅट्सअॅप ग्राहकांना तुर्तास उपलब्ध नाही. या फिचरवर सध्या काम सुरु असल्याचं व्हॅट्सअॅपने म्हटलं आहे. डिसअपियरिंग (Disappearing Message) या फिचरसोबत ‘व्ह्यू वन्स’ याचं समानता असली तरिही दोन्ही फिचर्स वेगळी आहेत.

तुमचं व्हॉट्सअ‍ॅप झालं असेल किंवा तुम्ही अपडेट केलं असेल तर तुम्हाला चॅटमध्ये फोटो / व्हिडिओ पाठविताना ‘व्ह्यू वन्स’ चा ऑप्शन दिसेल. या फीचरमधील महत्वाची त्रुटी म्हणजे, फोटो अथवा व्हिडिओचा स्क्रीन शॉट घेऊन सेव्ह करता येते. ‘व्ह्यू वन्स’ हे फिचर अनेबल करणं खूप सोपं आहे. यासाठी पाठवणारा फोटो अथवा व्हिडिओला पाठवण्यापूर्वी कॅप्शनमध्ये सिलेक्ट करता येतं.

हेही वाचा: Online Gaming: रम्मी, पोकरवरील बंदी उठवली

डिसअपियरिंगपेक्षा यामध्ये वेगळं काय?

डिसअपियरिंग या फिचरमध्ये सात दिवसानंतर मेसेज आपोआप डिलीट होतो तर ‘व्ह्यू वन्स’ या फिचरमध्ये फोटो अथवा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच डिलीट होतो.

हेही वाचा: बांगलादेशचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाला लोळवलं

डिसअपीयरिंग कसं सुरु कराल?

डिसअपीयरिंग मेसेज' फीचरला अॅक्टिव करणं सोपं आहे. सर्वात आधी त्या चॅटला ओपन करा, ज्याचे मेसेज आरोपाठ डिलिट करायचे आहेत. त्यानंतर त्या युजर्सची प्रोफाइल दिसेल. त्या नावावर क्लीक केल्यानंतर डिसअपीयरिंग मेसेज हा पर्याय दिसेल. तो ऑन करा.

loading image
go to top