... तर नव्या वर्षात व्हॉट्सऍप होणार बंद

वृत्तसंस्था
शनिवार, 22 डिसेंबर 2018

31 डिसेंबर नंतर व्हॉट्सऍप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणं बंद करणार आहे. त्यामुळे त्यांच्या मोबाइलमधील व्हॉट्सऍप चालणार नाही. 

व्हॉट्सऍपने दिलेल्या माहितीनुसार, नोकियाचा जुना ऑपरेटिंग सिस्टम व्हॉट्सऍपचा वापर करू शकणार नाही. नोकिया S40, या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनमध्ये 31 डिसेंबरनंतर व्हॉट्सऍप चालणार नाही. तसेच अँड्रॉईड 2.3.7 आणि जुन्या व्हर्जनसोबत आयफोन iOS7 वर 1 फेब्रुवारी नंतर व्हॉट्सऍप चालणार नाही. 

तसेच काही फीचर्स केव्हाही बंद होणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. याआधी व्हॉट्सऍपने विंडोज फोन 8.0, ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी 10 या मोबाइलमधील व्हॉट्सऍप बंद झाले होते. 

मेसेजिंग ऍपममध्ये व्हॉट्सऍप सगळ्यात जास्त वापरले जाते. त्यामुळे त्याचे सतत नवे नवे अपडेट्स येत असतात. आता एक नवे फीचर व्हॉट्सऍप आणणार आहे. या गुड न्यूजसोबतच व्हॉट्सऍपच्या काही जुन्या युजर्ससाठी बॅड न्यूज सुद्धा आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp to end support for this platform after 31 December 2018: Here's how you can continue using WhatsApp