Whatsapp New Feature : गुड न्यूज! व्हॉट्सअ‍ॅपवर मल्टी-अकाउंट फीचरची एन्ट्री, कसं वापराल? पाहा एका क्लिकवर

Whatsapp multi account support feature : आयफोन वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप लवकरच मल्टी अकाउंट सपोर्ट फिचर आणणार आहे. हे फीचर काय आहे जाणून घ्या.
Whatsapp multi account support feature
Whatsapp multi account support featureesakal
Updated on

Whatsapp Multiple Account Feature : व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट येणार आहे. आता iPhone वापरकर्ते लवकरच एकाच डिव्हाइसवर वैयक्तिक आणि व्यावसायिक WhatsApp खाती सहज वापरू शकणार आहेत. Meta मालकीच्या या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये iOS साठी मल्टी अकाउंट सपोर्ट फिचर विकसित करण्यात येत असून लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

काय आहे हे मल्टी-अकाउंट फिचर?

नवीन फिचरअंतर्गत, WhatsApp अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये “Account List” नावाचा एक स्वतंत्र विभाग असेल. या विभागात सर्व साइन-इन केलेली WhatsApp खाती दाखवली जातील आणि वापरकर्ते एकाच टॅपमध्ये खाते बदलू शकतील लॉगआउट किंवा अ‍ॅप रीस्टार्ट करण्याची गरज भासणार नाही.

मुख्य फीचर्स काय असतील?

  • वेगवेगळी WhatsApp खाती एका iPhone वर वापरण्याची मुभा

  • प्रत्येक खात्याचा स्वतंत्र चॅट हिस्टरी, मीडिया आणि सेटिंग्जसह सहज अ‍ॅक्सेस

  • खाते स्विच केल्यावर लगेच त्या खात्याच्या सूचना, टोन, बॅकअप आणि डाउनलोड पर्याय सक्रिय होतील

  • नवीन मेसेजची सूचना त्या-त्या खात्याच्या नावासह येईल, त्यामुळे कोणत्या अकाउंटसाठी मेसेज आला हे लगेच ओळखता येईल

  • नोटिफिकेशनवर टॅप केल्यावर थेट संबंधित खाते उघडेल आणि चॅट सुरू करता येईल

Whatsapp multi account support feature
Fridge in Monsoon : पावसाळ्यात थोडा वेळ फ्रीज बंद ठेऊ शकतो का? वीज बिलावर होतो 'असा' परिणाम..

दोन फोनची झंझट संपली

हे फिचर विशेषतः व्यावसायिक आणि वैयक्तिक वापरासाठी दोन वेगवेगळे WhatsApp अकाउंट वापरणाऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. यामुळे एकापेक्षा जास्त फोन घेण्याची गरज उरणार नाही आणि लॉगइन-लॉगआउट करण्याची वेळ देखील वाचणार आहे.

अद्याप विकासाच्या टप्प्यात

WABetaInfo च्या अहवालानुसार, हे फिचर सध्या iOS वरील WhatsApp Beta (वर्जन 25.19.10.74) मध्ये दिसले असून अद्याप Apple TestFlight बीटा वापरकर्त्यांनाही ते उपलब्ध झालेले नाही. कंपनीने अद्याप या फिचरच्या अधिकृत लॉन्च तारखेची घोषणा केलेली नाही.

Whatsapp multi account support feature
Motorola Razr 50 Ultra मोबाईल झाला एकदम स्वस्त! मिळतोय चक्क 35 हजारांचा बंपर डिस्काउंट, ऑफर पाहा एका क्लिकवर..

व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवे आणि भन्नाट अपडेट iPhone वापरकर्त्यांना एकाच डिव्हाईसवर अनेक खात्यांचा सहज अनुभव देणार आहे. यामुळे व्यवसाय, खाजगी जीवन आणि संवाद यामध्ये स्पष्टपणा व सोयीचा अनुभव मिळणार आहे. आता फक्त या फिचरच्या अधिकृत रिलीजची प्रतीक्षा आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com