

WhatsApp Rolls Out Quick Search Shortcut for iOS Chats and Channels
esakal
New WhatsApp Feature for iOS: iPhone युजर्सचा WhatsApp वापरण्याचा अनुभव आणखी जलद आणि सुटसुटीत करण्यासाठी कंपनीने एक नवा आणि उपयुक्त बदल केला आहे. व्हॉट्सॲपने iOS युजर्ससाठी थेट चॅट स्क्रीनवरच 'इन-चॅट सर्च शॉर्टकट' (In-Chat Search Shortcut) हे नवे फीचर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. या सुविधेमुळे आता युजर्सना चॅट्स किंवा चॅनेल्समधील जुने महत्त्वाचे मेसेजेस शोधण्यासाठी वेगळ्या पर्यायांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.