

WHATSAPP SIM BINDING RULES FOR INDIAN TRAVELLERS ABROAD
sakal
WHATSAPP NEW SIM CARD REQUIREMENTS FROM JANUARY 2027: परदेशात फिरायला किंवा कामानिमित्त जाताना अनेकजण भारतीय सिमकार्डऐवजी तिथले स्थानिक सिमकार्ड वापरतात. काहीजण वायफाय (Wi-Fi) च्या मदतीने इंटरनेट वापरून व्हॉट्सअॅप आणि इतर मेसेजिंग अॅप्सवरून लोकांशी संपर्कात राहतात. पण, आता या गोष्टीत बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार १ जानेवारी २०२७ पासून व्हॉट्सअॅप आणि इतर मेसेजिंग अॅप्ससाठी नवा SIM-Binding नियम लागू करणार आहे. या नियमामुळे परदेशात जाणाऱ्या भारतीयांना व्हॉट्सअॅप वापरताना काही अडचणी येऊ शकतात. नेमका काय आहे हा नियम आणि त्याचा प्रवाशांवर काय परिणाम होणार? जाणून घेऊया.