WhatsApp वर मिळेल इंस्टाग्रामचा आनंद; लवकरच येतंय रिॲक्शन फीचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp

WhatsApp वर मिळेल इंस्टाग्रामचा आनंद; लवकरच येतंय रिॲक्शन फीचर

जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप्सपैकी एक, WhatsApp हे गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फीचर अपडेट देत आहे. बऱ्याच दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की, व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी काहीतरी खास घेऊन येत आहे ज्यामुळे चॅटिंग करण्याची पद्धत बदलेल. हे नवीन फीचर इंस्टाग्रामवर पुर्वीपासून आहे आणि ते आता व्हॉट्सॲप यूजर्ससाठी रिलीज करण्यात येत आहे.

WhatsApp ने आपल्या Android बीटा वापरकर्त्यांसाठी एक नवीन अपडेट, 2.21.24.8 जारी केले आहे, ज्यामध्ये हे स्पष्ट केले आहे की कंपनी एका फीचरवर काम करत आहे ज्यामध्ये तुम्हाला Instagram सारखे मॅसेजना रिॲक्शन देता येतील. हे नवीन फीचर मिळविण्यासाठी, तुमच्याकडे WhatsApp Android बीटा वर्जन 2.21.24.8 असणे आवश्यक आहे. बीटा व्हर्जन असूनही तुम्हाला हे फीचर वापरता येत नसेल, तर तुम्ही ते APK मिररवरून ते घेऊ शकता.

WhatsAppध्ये रिॲक्शन नोटिफिकेशन

व्हॉट्सॲप मेसेज रिॲक्शन नावाचे एक नवीन फीचर तयार करत असल्याचे काही रिपोर्टमध्ये आधीच समोर आले होते. तसेच कंपनीने हे फीचर चुकीच्या पद्धतीने इनेबल केले आणि ते लगेच काढून टाकले होते. दरम्यान आता हे फीचर व्हॉट्सॲप बीटामध्ये अँड्रॉइड व्हर्जन 2.21.22.7 अपडेटसाठी देण्यात आले आहे. हे फीचर बीटा व्हर्जनचा एक भाग म्हणून उपलब्ध आहे त्यामुळे हे सध्या सर्वांसाठी उपलब्ध नसले. तरीही तुम्ही ते वापरुन पाहू शकता.

यापूर्वी, iOS साठी WhatsApp रिॲक्शन नोटिफिकेशन मॅनेज करण्याच्या पध्दतीवर काम करत होते. WABetaInfo चा दावा आहे की आता कंपनी हे फीचर Android वर आणण्याचा विचार करत आहे सध्या कंपनी बीटा व्हर्जनवर फीचरची टेस्टींग करत आहेत आणि भविष्यात हे अपडेटमध्ये रोल आउट केले जाऊ शकते.

हेही वाचा: मतदार ओळखपत्रात घरबसल्या अपडेट करा नवीन पत्ता, वाचा सोपी प्रोसेस

तुम्ही ग्रुप आणि पर्सनल चॅट्ससाठी रिॲक्शन नोटिफिकेशन देखील मॅनेज करू शकता. वापरकर्त्यांसाठी हे फीचर प्रत्यक्षात कधी येईल याबद्दल सध्या माहिती उपलब्ध नाही. दरम्यान रिॲक्शन नोटिफिकेशन फीचरसह व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी इतर अनेक फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सॲप बिझनेसच्या वापरकर्त्यांना लवकरच 'Ads on Facebook' ऑप्शन देण्यात येईल. याव्यतिरिक्त, iOS वापरकर्त्यांना लवकरच 'माय कॉन्टॅक्ट अक्सेप्ट' फीचरसह एक चांगला प्रायव्हसी ऑप्शन देण्यात येईल. त्यांना त्यांचा लास्ट सीन, प्रोफाइल फोटो आणि निवडलेल्या कॉन्टॅक्ट्सपासून माहिती लपवता येईल.

हेही वाचा: पुढच्या आठवड्यात लॉंच होतायत 'हे' दमदार स्मार्टफोन्स, वाचा डिटेल्स

loading image
go to top