WhatsApp Update: मेसेज टू योरसेल्फ! भारतीयांसाठी WhatsApp घेऊन येणार नवं फीचर...

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp लवकरच मेसेज टू योरसेल्फ नावाचे फीचर रोलआउट करणार आहे. यामुळे यूजर्सला खासगी माहिती सेव्ह करण्यास मदत होईल.
Whatsapp Features
Whatsapp FeaturesSakal

WhatsApp Latest Features: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp आपल्या यूजर्सला शानदार चॅटिंग एक्सपीरियन्स देण्यासाठी नवनवीन फीचर आणत असते. आता कंपनी अशाच एका शानदार फीचरला लाँच करणार असून, याद्वारे यूजर्स स्वतःलाच मेसेज करू शकतील. या फीचरची मागणी यूजर्स अनेक दिवसांपासून करत होते. हे फीचर कसे काम करते? याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचाः काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

WhatsApp चे नवीन फीचर नक्की काय आहे?

WhatsApp ने माहिती दिलीये की, चॅट विथ योरसेल्फ फीचर लवकरच रोलआउट केले जाणार आहे. याद्वारे, यूजर्सला नोट्स, रिमाइंड आणि अपडेट पाठवण्यास मदत होईल. थोडक्यात, डिजिटल माहिती चॅट योरसेल्फवर सेव्ह करू शकतात. हे नवीन फीचर अँड्राइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाइससाठी उपलब्ध होईल.

कसे काम करेल नवीन फीचर?

  • सर्वात प्रथम व्हॉट्सअ‍ॅप उघडा.

  • आता नवीन चॅट तयार करा.

  • आता लिस्टमधील सर्वात वरती असलेल्या मेसेज योरसेल्फवर क्लिक करा.

Whatsapp Features
Online Shopping: शॉपिंग करताना 'या' टिप्स करा फॉलो, Flipkart-Amazon वर निम्म्या किंमतीत मिळतील वस्तू

काही दिवसांपूर्वीच लाँच केले आहे पोल फीचर

WhatsApp ने काही दिवसांपूर्वीच अँड्राइड आणि आयओएस यूजर्ससाठी एक नवीन फीचर रोलआउट केले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स कोणत्याही विषयावर सर्वेक्षण करू शकतात. या फीचरला पोल नाव देण्यात आले आहे. परंतु, व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी अद्याप हे फीचर रोलआउट करण्यात आलेले नाही.

ग्रुपमध्ये करू शकता पोल फीचरचा वापर

तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन असणे गरजेचे आहे. पोल फीचरचा वापर करण्याासाठी तुम्हाला वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटवर जावे लागेल. आयओएसमध्ये चॅट बॉक्सच्या बाजूला असलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक केल्यास हे फीचर दिसेल. अँड्राइड फोनमध्ये पेपरक्लिप आयकॉनवर क्लिक केल्यास या फीचरचा वापर करू शकता. पोलमध्ये तुम्ही जास्तीत जास्त १२ पर्याय जोडू शकता. येथे तुम्हाला वोट पाहण्याचा देखील पर्याय मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com