esakal | व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो आपोआप होतील डिलीट आणि बदलेल व्हॉईस मेसेजची स्पीड!
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp

व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो आपोआप होतील डिलीट आणि बदलेल व्हॉईस मेसेजची स्पीड!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

व्हॉट्सअ‍ॅप हे त्याच्या Android, iOS आणि वेब / डेस्कटॉप प्लॅटफॉर्मवर 24 तासांत मॅसेज गायब होण्याचे फीचरची टेस्ट घेत आहे. या इन्स्टंट मेसेजिंग अॅपकडे आधीपासूनच हा पर्याय आहे, जो वापरकर्त्यांना डिसअपीयरिंग मॅसेजसाठी आठवड्याची (7 दिवस) वेळ सेट करण्याचा पर्याय देण्यात येतो. या पर्यायासोबत व्हॉट्सअ‍ॅप आता टेलिग्राम अ‍ॅपशी स्पर्धा करीत आहे, जे वापरकर्त्यांना आधीच असे पर्याय देत आहे. अलीकडे, व्हॉट्सअ‍ॅपच्या सार्वजनिक बीटा चॅनेलवर व्हॉईस मॅसेजसाठी प्लेबॅक गती बदलण्याच्या फीचरची चाचणी देखील करण्यात आली होती. पण त्यानंतर हे फीचर बीटा अपडेटमध्यून काढण्यात आले होते.

व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा प्रोग्राममधील फीचरची टेस्ट व माहिती प्रकाशित करणारी वेबसाईट WABetainfoच्या अहवालात असे म्हटले आहे की व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज गायब हेण्याच्या फीचरमध्ये सध्या असलेल्या 7-दिवसाच्या पर्याया व्यतिरिक्त 24 तासांचा पर्याय जोडण्याची योजना आखत आहे. अॅप त्याच्या Android, iOS आणि वेब / डेस्कटॉप प्लॅटफॉर्मवर या पर्यायाची चाचणी करत आहे. वेबसाइटद्वारे शेयर केलेल्या स्क्रीनशॉट मध्ये डिसअपीयरिंग मॅसेज फीचरमध्ये 24 तासांचा पर्याय दाखवला आहे, जेथे वापरकर्ते वैयक्तिक आणि ग्रुप चॅटसाठी हा पर्याय निवडता येईल. या फीचरमध्ये वापरकर्त्याने पाठविलेले संदेश निश्चित वेळ पूर्ण झाल्यावर आपोआप हटविले जातात. सध्या डिसअपीयरिंग मॅसेज फीचर केवळ 7 दिवस ऑफर करते.

व्हॉट्सअ‍ॅपने यापूर्वी केवळ एडमिन्सना डिसअपीयरिंग मॅसेज कंट्रोल करण्याचा पर्याय दिला होता. अलीकडेच कंपनीने आयओएससाठी एक अपडेट दिले आहे, जे एका ग्रुपच्या सर्व सदस्यांना डीसअपीरिंग मेसेजेस सेटिंग डीफॉल्टनुसार बदलू देते. व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर Disappearing Photos फीचर आणण्याच्या क्षमतेची व्हॉट्सअ‍ॅप चाचणी देखील करत आहे.

याव्यतिरिक्त, एका अहवालात असे म्हटले आहे की व्हॉट्सअ‍ॅपने सार्वजनिक बीटा चॅनेलवर व्हॉईस मॅसेज प्लेबॅक स्पीड फीचरची चाचणी केली आहे. हे व्हॉट्सअ‍ॅपवर काही वापरकर्त्यांसाठी अँड्रॉइड बीटा 2.21.9.4 साठी देखील सक्षम केले होते, परंतु दुसर्‍या दिवशी बीटा 2.21.9.5 अपडेट द्वारे काढले गेले.

loading image