WhatsApp Tips : आता व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉईस अन् व्हिडिओ कॉल करता येणार रेकॉर्ड; 'या' आहेत स्टेप्स

सध्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे.
WhatsApp Tips
WhatsApp Tips Sakal
Updated on

How To Record Whatsapp Audio And Video Call : सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या युगात आज प्रत्येकजण मेसेज आणि चॅटिंगसाठी इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. हा आनंद द्विगुणीत होण्यसाठी व्हॉट्सअ‍ॅपदेखील वेळोवेळी अपडेट देत असते.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

WhatsApp Tips
UPI Apps: आता मराठीतही करता येणार UPI पेमेंट

सध्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. मात्र, अनेकदा काही गोष्टी कामाच्या गडबडीत लक्षात राहत नाही. त्यासाठी अनेकजण कॉल रेकॉर्डचा पर्याय वापरतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काहीसोप्या गोष्टी सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचे व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स सहज रेकॉर्ड करू शकाल.

WhatsApp
WhatsApp Sakal
WhatsApp Tips
WhatsApp Tips : आता दोन फोनमध्ये वापरता येणार सेमनंबरचं व्हॉट्सअ‍ॅप; असं करा अ‍ॅक्टिव्हेट

व्हॉट्सअ‍ॅपवर कसे कराल कॉल रेकॉर्ड

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल रेकॉर्ड करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाहीये. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप व्हॉईस कॉल रेकॉर्ड करायचे असतील तर, त्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅप वापरावे लागतील. व्हॉट्सअ‍ॅप व्हॉईस कॉल रेकॉर्ड करण्यासाठी प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरमधून तुम्ही एखादे थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करू शकता.

Android डिव्हाइसवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही क्यूब कॉलअ‍ॅपचीही मदत घेऊ शकता. अ‍ॅप डाउनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. आता WhatsApp वर कॉल करण्यासाठी तुम्हाला एक वेगळे क्यूब कॉल विजेट दिसून येईल. तुम्ही जेव्हा केव्हा WhatsApp वर कॉल कराल तेव्हा ते तुमचा कॉल रेकॉर्ड करेल आणि फोन स्टोरेजमध्ये सेव्ह करेल.

WhatsApp Tips
Instagram : एकदम सोप्पयं...इंस्टाग्राम चॅटमधून मॅसेज डिलीट करायचं

आयफोनवर कसा कराल कॉल रेकॉर्ड

अ‍ॅनरॉइड डिव्हाइसच्या तुलनेत आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करणे थोडे कठिण आहे. आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला मॅक कॉम्प्युटरवर क्विक टाईम अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. हे डाऊनलोड झाले की, आता आयफोनला मॅकशी कनेक्ट करा आणि अ‍ॅप उघडा.

यानंतर, तुम्हाला फाइल ऑप्शनवर जाऊन न्यू ऑडिओ रेकॉर्डिंग आणि आयफोनचा ऑप्शनचा पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्हाला अ‍ॅपमध्ये एक नवीन रेकॉर्ड बटणाचा पर्याय दिसेल. व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग दरम्यान त्यावर टॅप करून तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकाल.

WhatsApp Tips
Scheduled Message On WhatsApp : आता गर्लफ्रेंडला शेड्यूल करून द्या 'बर्थ डे'च्या शुभेच्छा

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल कसे कराल रेकॉर्ड

अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर असे फीचर आहे, ज्याद्वारे व्हिडिओ कॉल सहज रेकॉर्ड केले जाऊ शकतात. स्क्रीन रेकॉर्डिंग असे या फिचरचे नाव आहे. व्हि़डिओ काॉल रेकॉर्ड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला हे फीचर अ‍ॅक्टिव्हेट करावे लागेल. त्यानंतर तुम्ही कोणत्याही अडचणींशिवाय व्हिडिओ कॉल ऑटोमॅटिकली रेकॉर्ड करू शकाल.

आज बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक स्मार्टफोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग फीचर नसेल, तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन DU रेकॉर्डर अ‍ॅप डाउनलोड करू शकता. हे अ‍ॅप ओपन करताच तुम्हाला आवश्यक परवानग्यां द्याव्या लागतील. यावर क्लिक करून तुम्ही सहजपणे व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करू शकाल.

WhatsApp Tips
WhatsApp Feature : व्हॉट्स ॲपवर सतत येणाऱ्या मेसेजला कंटाळलात, आलं DND फिचर

आयफोनमध्ये व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करण्यासाठी आयफोनच्या खालच्या बाजूने वर स्वाइप करा. यानंतर तुमच्या समोर कंट्रोल पॅनल ओपन होईल. आता येथे तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगचा पर्याय दिसेल, त्यावर टॅप केल्यास तुमचे व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग सुरू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.