UPI Apps: आता मराठीतही करता येणार UPI पेमेंट

यूपीआई पेमेंट करताना लोक वेगवेगळ्या appsचा वापर करताना दिसतात.
upi apps
upi appssakal

हल्ली टेक्नोलॉजी इतकी समोर आहे की डिजिटलाइजेशनमुळे अनेक गोष्टी सहज सोपी झाल्यात. लोक कॅशलेस ट्रांजेक्शन करणे अधिक पसंद करतात. त्यामुळे UPIचा वापरही खूप वाढलाय. यूपीआई पेमेंट (UPI Payment) करताना लोक वेगवेगळ्या appsचा वापर करताना दिसतात.

फोन पे (Phonepe), गूगल पे (Google Pay) किंवा पेटीएम (Paytm) सारखे Appsचा सर्वात जास्त वापर करतात. Apps द्वारे तुम्ही काही क्षणात आपल्या खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवू शकता. (UPI Apps gpay phonepe paytm know how to change language)

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

अनेकजण या Appsचा वापर करताना इंग्रजी भाषा वापरतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का या Apps द्वारे तुम्ही हिंदी किंवा मातृभाषेचाही वापर करू शकता. तुम्ही Appच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला हवी ती भाषा निवडू शकता.

upi apps
PhonePe वर आलं भन्नाट फीचर! आता डेबिट कार्डशिवायही सुरू करा UPI खातं

भाषा कशी निवडायची?
जर तुम्हाला UPI Apps चा वापर करताना इंग्रजी भाषा हवी नसेल तर तुम्ही तुमची मातृभाषाही निवडू शकता. यासाठी Appsच्या सेटिंगमध्ये तुम्हाला बदल करावे लागेल. यामुळे तुम्हाला वीज बिलचा पेमेंट, यूटिलिटी बिल पेमेंट किंवा ट्रांजॅक्शन करणे, क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट करणे इत्यादी कामासाठी तुम्ही बिनधास्तपणे हवी ती भाषा वापरु शकता.

मातृभाषेचा ऑप्शन यासाठी देण्यात आला आहे की UPI प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त लोकांनी वापर करावा. यासाठी Language Setting मध्ये जाऊन तुम्ही भाषा बदलवू शकता.

upi apps
UPI Payment : इंटरनेट नसेल तर ऑफलाइनही होईल पेमेंट; 'या' बँका देणार सुविधा

PhonePe चे कस्टमरनी अशी भाषा बदलवा.

  1. जर तुम्ही फोन पे यूजर आहात तर सर्वात आधी मोबाईल ओपन करा.

  2. त्यानंतर लँग्वेज चेंज करण्यासाठी प्रोफाइल ऑप्शनवर क्लिक करा.

  3. त्यानंतर Drop Down करा आणि Settings and Preferences ऑप्शन वर क्लिक करा.

  4. त्यानंतर Languages चेऑप्शन निवडा आणि Continue वर क्लिक करा.

  5. त्यानंतर तुम्ही फोन पे मध्ये भाषा जसे की हिंदी, मराठी, इत्यादी भाषा निवडा.

  6. यानंतर तुम्ही मातृभाषा वापरु शकता.

upi apps
#Gpay : कालपर्यंत लोकप्रिय असलेल्या 'जीपे' अॅपवर का संतापलेत त्याचे वापरकर्ते ?

GPay चे कस्टमरनी अशी भाषा बदलवा -

  • सर्वात आधी गूगल पे App ओपन करा.

  • यानंतर प्रोफाइल ओपन करा.

  • सेटिंग ऑप्शन वर क्लिक करा.

  • आपको स्क्रीनवर पर्सनल माहिती दिसेल त्यावर क्लिक करा.

  • यानंतर खालच्या बाजूला Language चे ऑप्शन दिसेल आणि क्लिक करा.

  • त्यानंतर आपल्या आवडत्या भाषेची निवड करा.

upi apps
हॉर्न वाजविताना पाहिल्याच्या रागातुन विद्यार्थ्यांना मारहाण; Gpay ने घेतले 50 हजार

Paytm च्या कस्टमरनी अशी भाषा बदलवा -

  1. सुरवातीला आपला मोबाइल app ओपन करा

  2. यानंतर App ची प्रोफाइलवर जा आणि सेटिंग ऑप्शनवर क्लिक करा.

  3. यानंतर Language बदलण्याचं ऑप्शन दिसेल.

  4. आपली भाषा निवडा आणि Continue म्हणून क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com