Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये झाली नव्या फीचरची एन्ट्री, बघा एका क्लिकवर..

WhatsApp ‘Raise Hand' feature : व्हॉट्सअ‍ॅप लवकरच ‘Raise Hand’ नावाचं नवीन फीचर आणणार आहे, ज्यामुळे ग्रुप कॉल्समध्ये सहभाग अधिक शिस्तबद्ध होईल.
WhatsApp ‘Raise Hand' feature
WhatsApp ‘Raise Hand' featureesakal
Updated on

Whatsapp New Feature : जगातील सर्वाधिक वापरली जाणारी मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन WhatsApp आता ग्रुप कॉलिंग अनुभव आणखी सुधारण्याच्या तयारीत आहे. WhatsApp लवकरच एक नवं आणि उपयुक्त फीचर ‘Raise Hand’ (हात वर करा) आपल्या अ‍ॅपमध्ये सादर करणार आहे. याच्या मदतीने ग्रुप व्हॉईस किंवा व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी होणारे वापरकर्ते आपली बोलण्याची इच्छा इतरांना सिग्नलद्वारे दाखवू शकतील, जेणेकरून संभाषणात अडथळे येणार नाहीत आणि संवाद अधिक शिस्तबद्ध व सुसंगत होईल.

WABetaInfo च्या अलीकडील अहवालानुसार, हे फीचर सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या Android 2.25.19.7 बीटा व्हर्जनमध्ये चाचणी टप्प्यात आहे. यामध्ये वापरकर्ते Raised Hand (हात वर करणारा इमोजी) वापरून इतर सहभागी सदस्यांना सूचित करू शकतात की ते काहीतरी बोलू इच्छित आहेत. यामुळे अनेक जण एकाच वेळी बोलण्याचा त्रास टळेल आणि संवादात सुसंगती राहील.

व्हर्च्युअल मिटिंग्स, ऑनलाइन क्लासेससाठी फायदेशीर

हे फीचर विशेषतः ऑनलाइन मीटिंग्स, वर्च्युअल क्लासरूम्स, कौटुंबिक गप्पा किंवा व्यावसायिक चर्चांमध्ये उपयुक्त ठरेल. एकाच वेळी अनेक जण बोलू लागल्यास संवाद विस्कळीत होतो, परंतु 'Raise Hand' फीचरमुळे प्रत्येकाला आपली संधी मिळेल आणि संवाद चांगला होईल.

WhatsApp ‘Raise Hand' feature
Data Leak : सावधान! तुमचं अकाऊंट सेफ तर आहे ना? इतिहासातील सर्वात मोठ्या डेटा लिकचा उलगडा, तब्बल १६०० कोटी पासवर्ड्स हॅक

Zoom आणि Microsoft Teams प्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपमध्येही नवा अनुभव

जरी ‘Raise Hand’ फीचर Zoom किंवा Microsoft Teams सारख्या व्यासपीठांवर पूर्वीपासून उपलब्ध असले, तरी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपमध्ये हे प्रथमच येत आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर व्यवसायिक आणि शैक्षणिक गरजांसाठी आणखी उपयुक्त ठरेल.

WhatsApp ‘Raise Hand' feature
Vivo Y400 Pro 5G भारतात लॉन्च; फक्त 10 हजारात सुपर स्मार्टफोन, दमदार फीचर्स पाहा एका क्लिकवर

सध्या बीटा टप्प्यात, लवकरच सर्वांसाठी उपलब्ध

सध्या हे फीचर विकासाच्या अंतिम टप्प्यात असून, प्रथम बीटा वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर, लवकरच हे अपडेट सर्व व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी रोलआउट केलं जाईल. आता ग्रुप कॉलिंगमध्ये गोंधळ नाही फक्त Raise Hand करून आपली संधी मिळवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com