esakal | एका स्मार्टफोनवर चालवा दोन WhatsApp अकाउंट, जाणून घ्या ट्रिक
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp

एका स्मार्टफोनवर चालवा दोन WhatsApp अकाउंट, जाणून घ्या ट्रिक

sakal_logo
By
टीम ईसकाळ

सध्या आपल्या सगळ्यांसाठी WhatsApp अत्यंत गरजेचे झाले आहे. आपल्या दररोजच्या कामात त्याचा सर्रास वापर केला जातो. आता तुम्ही आपल्या एकाच मोबाइलवर दोन भिन्न व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स वापरू शकता. हो हे शक्य आहे. सहसा एका फोनवर एकाच नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट चालवता येते, पण आज आपण अशा खास ट्रिकबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या एका मोबाइलवर दोन वेगळे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स वापरु शकाल. (whatsapp-tricks-to-how-to-use-two-whatsapp-in-one-mobile)

फोनवर दोन व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स चालवा

  • तुमच्या मोबाईलमध्ये दोन वेगवेगळे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट चालवण्यासाठी आधी फोनच्या सेटिंगमध्ये जा

  • सेटिंगमध्ये खाली स्क्रोल करत जा

  • आता एप्लिकेशन आणि परमिशन्स या पर्यायावर टॅप करा

  • आपल्याला अ‍ॅप क्लोन हे फीचर दिसेल, त्यावर क्लिक करा

  • आता व्हॉट्सअ‍ॅपवर क्लिक करा

  • हा पर्याय क्लिक केल्यावर तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा क्लोन तयार होईल.

  • यानंतर तुम्ही एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट चालवू शकाल

हेही वाचा: BGMI अ‍ॅपमध्ये Error येतोय? या सोप्या टिप्सने करा दूर

नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक खास अपडेट लॉंच केले आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉलिंग दरम्यान दिसेल. नवीन अपडेटनुसार ग्रुप कॉलकरणे आणखी सोपे होईल. नवीन अपडेटनंतर, किती लोक ग्रुप कॉलमध्ये कनेक्ट आहेत आणि किती नाहीत हे वापरकर्त्यास पहाता येईल. व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर Google मीट आणि झूम सारख्या व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप्सना जोरदार टक्कर देणार आहे.

पुर्व व्हॉट्सअ‍ॅपचा व्हिडीओ कॉल सुरू होताच सगळे जॉईन होऊ शकत असत. तसेच, ग्रुप कॉल दरम्यान फक्त एक वापरकर्ताच दुसऱ्या व्यक्तील जॉईन करु शकत असे . व्हिडीओ कॉल मिल झाला तर त्याला पुन्हा कॉलमध्ये सामील होण्याचा पर्याय देण्यात आलेला नव्हता. यासाठी ग्रुप कॉलिंग दरम्यान युजरला रिक्वेस्ट पाठवावी लागत असे. परंतु नवीन फीचरमध्ये आपण एखादा ग्रुप कॉल मिस केला तरीही आपण पुन्हा कनेक्ट होऊ शकणार आहात.

(whatsapp-tricks-to-how-to-use-two-whatsapp-in-one-mobile)

हेही वाचा: Airtel चा कुटुंबासाठी बेस्ट प्लॅन, 260 GB डेटा अन् बरंच काही

loading image
go to top