WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

WhatsApp Username Feature व्हॉट्सॲप’च्या या नवीन फिचरमुळे ‘यूझर’ना स्वतःचा फोन नंबर शेअर न करता केवळ ‘यूझरनेम’द्वारे एकमेकांशी संवाद साधता येणार आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने भारतात याला ब्रेक लावलाय.
India Puts WhatsApp Username Feature on Hold

India Puts WhatsApp Username Feature on Hold

Esakal

Updated on

नवी दिल्ली, ता. १ (वृत्तसंस्था) : यूझरच्या सुरक्षिततेचा आणि सायबर गुन्ह्यांचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘मेटा’च्या मालकीच्या ‘व्हॉट्सॲप’ला मोठा झटका दिला आहे. ‘व्हॉट्सॲप’ने प्रस्तावित केलेले नवीन ‘यूजझरनेम’ फीचर तूर्तास लाँच करू नये, असे निर्देश सरकारने दिले आहेत. या विषयावर सविस्तर अभ्यास आणि चर्चा पूर्ण होईपर्यंत हे फीचर थांबवण्याचे सांगण्यात आले असून, कंपनीला यावर पुढील तीन दिवसांत सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com