esakal | कम्प्युटर, लॅपटॉप वर 'असे' हाईड करा 'Whatsapp चे सीक्रेट चॅट
sakal

बोलून बातमी शोधा

कम्प्युटर, लॅपटॉप वर 'असे' हाईड करा 'Whatsapp चे सीक्रेट चॅट

कम्प्युटर, लॅपटॉप वर 'असे' हाईड करा 'Whatsapp चे सीक्रेट चॅट

sakal_logo
By
अर्चना बनगे

स्मार्टफोन वरील चॅट हाइड करण्यासाठी आपण खूप सार्‍या टेक्निक वापरतो. पण कधि-कधि आपले प्रयत्न फोल ठरतात. आज तुम्हाला कॉम्प्युटर आणि लॅपटॉप वर समोर दिसणारे चाट हाइड कसे करावे या टिप्स आम्ही सांगणार आहोत.

Whatsapp Web : व्हाट्सअप चा वापर वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्ती करत असतात. अनेक वेळा वैयक्तिक चॅटिंग दुसऱ्याला दिसू नये याची खबरदारी आपण घेत असतो. यासाठी तुम्ही अनेक उपाय फॉलो करता. परंतु आज आम्ही तुम्हाला कॉम्प्युटर आणि लॅपटॉप वर पर्सनल चाट कशा पद्धतीने हाईड करावे हे सांगणार आहोत.

खरंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून सध्या शाळा, कॉलेजचे शिक्षण किंवा ऑफिसमध्ये असणारे काम आता घरामध्येच करावी लागत आहे. त्यामुळे सतत संपर्कासाठी आपण व्हाट्सअप, PC किंवा लॅपटॉप वर लॉगिन करतो. ज्यामुळे महत्वाचे आलेले मेसेज पाहता यावेत. अशावेळी अनेक पर्सनल अथवा प्रायव्हेट मेसेज स्क्रीन वर  दिसण्याची भीती निर्माण होते. अशावेळी तुम्ही कॉम्प्युटर अथवा लॅपटॉप वर व्हाट्सअपचे सिक्रेट चाट  हाइड करू शकता

हेही वाचा- ट्रोलिंगपासून मुक्तता; यूजर्सना Twitter अकाऊंट हाईड करता येणार

असे करा मेसेज हाइड

कॉम्प्युटर आणि लॅपटॉप वरील व्हाट्सअप चॅट हाइड करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर अथवा ॲप्सची गरज लागत नाही. तर व्हाट्सअप मध्ये असलेल्या एका खास फिचरच्या मदतीने सीक्रेट चाट तुम्ही हाईड करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या  कॉम्प्युटरमध्ये व्हाट्सअप ला इंस्टॉल करा. इंस्टॉल केल्यानंतर जे चाट हाईड करायचे आहेत त्याच्या डाव्या साईडला सर्च हा मेनू ओपन करा. त्यानंतर डाव्या साईटच्या टेबलमध्ये ज्या ठिकाणी त्याची प्रोफाइल पिक्चर किंवा आयकाॅन आहे त्याच्या समोर वेळ लिहिलेली असेल त्याच्या  खाली अॅरो निशाण असेल, त्या  अॅरोवर क्लिक करा. त्याच्यावरती तुम्हाला अर्काईव्ह हा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा. त्यामुळे त्या अकाउंटचे चाट स्क्रीनवर येणे बंद होतील.

व्हाट्सअप चे चॅट आपण हाईड करण्यासाठीअर्काईव्ह चाट शिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. यानंतर जेव्हा जेव्हा तुम्हाला अर्काईव्ह चाट पहावयाचे असेल तर त्यावेळी कॉम्प्युटर वर असलेले व्हाट्सअप ॲप ओपन करा. त्यानंतर वरच्या बाजूस डाव्या साईडला तीन डॉट विकल्प येतील त्यावर क्लिक करा आणि अर्काईव्ह ऑप्शन शोधून तुम्हाला तुम्ही हाईड केलेले सर्व चार्ट पाहता येतील.काहीवेळा थर्ड पार्टी ॲप चॅट हाइड करण्यासाठी सल्ला देतात. परंतु कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सोर्सच्या माध्यमातून कोणतेही ॲप इन्स्टॉल करू नका.

loading image