esakal | स्कूल बसचा रंग पिवळाच का? जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारण
sakal

बोलून बातमी शोधा

स्कूल बसचा रंग पिवळाच का? जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारण

स्कूल बसला ठराविक रंग देण्यामागे एक खास कारण

स्कूल बसचा रंग पिवळाच का? जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारण

sakal_logo
By
शर्वरी जोशी

दररोज आपण रस्त्यावर असंख्य वाहने धावतांना पाहतो. यात वेगवेगळ्या आकार, रंग, मॉडेल अशा सर्वच वाहनांचा समावेश असतो. परंतु, काही वाहने ही अशी असतात जी पाहताच क्षणी ते कोणते आहेत किंवा कोणत्या कामासाठी वापरण्यात येतं हे आपल्या लक्षात येतं. उदाहरण घ्यायचं झालं तर रुग्णवाहिका, बस, टॅक्सी, स्कूल व्हॅन/ बस या गाड्यांची ओळख पटवणं फारसं कठीण आहे. या गाड्यांच्या रंगावरुनच आपण लगेच त्या ओळखू शकतो. मात्र, या गाड्यांना ठराविक रंगच का दिले जातात याचं कायम एक गुढ असतं. त्यामुळेच आज आपण स्कूल बस किंवा व्हॅनचा रंग कायम पिवळाच का असतो ते जाणून घेणार आहोत.

लहान मुलांना त्यांच्या घरापासून शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि परत घरी सोडण्यासाठी स्कूल व्हॅन/ बसचा वापर केला जातो. या व्हॅन कायम पिवळसर केशरी रंगाच्याच असतात. परंतु, या गाड्यांना हा ठराविक रंगच का दिला जातो हे फार कमी जणांना माहित आहे. विशेष म्हणजे हा ठराविक रंग देण्यामागे एक खास कारण आहे.पिवळा रंग हा कायम लक्ष वेधून घेतो. 

हेही वाचा : लग्नानंतर समजलं दोघे आहेत बहिण-भाऊ; तरी मोडला नाही संसार, कारण...

पिवळा रंग हा सहज दृष्टीस पडतो आणि लोकांचं लक्ष वेधून घेतो. त्यामुळे संध्याकाळची वेळ असतो वा पहाटेचा मंद प्रकाश या दोन्ही प्रकाशांमध्ये पिवळा रंग लगेच दिसून येतो. त्यामुळे लांबून जरी एखादी स्कूल व्हॅन येत असेल तर लगेच ते आपल्या लक्षात येतं. 

स्कूल व्हॅनचा रंग पिवळा असण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण

स्कूल बस पिवळ्या असण्यामागे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे हा रंग आपल्या डोळ्यांना लवकर आकर्षित होतो. आपल्या डोळ्यांना इतर रंगांच्या तुलनेत पिवळा रंग १.२४ पटीने जास्त आकर्षित होतो. त्यामुळे आपलं लक्ष नसेल तरीदेखील हा रंग आपलं लक्ष वेधून घेतो.
 

loading image