आपल्या मोबाईलवर चॅटजीपीटीचा वापर करणारे लाखो भारतीय आहेत. पण आता सरकारच्या मंत्रालयांमध्ये मात्र ही सुविधा वापरता येणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत..काही दिवसांपूर्वीच अर्थ मंत्रालयाने OpenAI च्या आगामी GPT-5.5 मॉडेलचा वापर करून सायबर सुरक्षा मजबूत करण्याची तयारी दाखवली होती. Anthropic कंपनीच्या क्लॉड एआयलाही काही विभागांनी बोलावले होते. परंतु शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) सर्वांना एकच सूचना दिली घाई करू नका.Mobile Health Disease : मोबाईलचा अतिवापर खराब करतंय तुमचं शरीर; होत आहेत 'हे' 6 आजार, रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा.सरकारने स्पष्ट केले की, सायबर सुरक्षा, कोडिंग आणि संवेदनशील कामांसाठी सध्या तरी OpenAI आणि Anthropic सारख्या परदेशी एआय कंपन्यांच्या मॉडेल्सचा वापर टाळावा. यामागे राष्ट्रीय सुरक्षा आणि डेटा गोपनीयतेची मोठी चिंता आहे. परदेशी कंपन्यांच्या एआयमध्ये आपला डेटा कुठे जातो, कोण त्याचा वापर करू शकतो, याबाबत पूर्ण विश्वास नाही..का घेतला हा निर्णय?ही कंपन्या सायबर हल्ले रोखण्यात तरबेज आहेत, पण तेच तंत्रज्ञान हल्ला करण्यासाठीही वापरले जाऊ शकते, अशी भीती सरकारला आहे. शिवाय सरकारी डेटा परदेशी क्लाउडवर गेल्यास त्याचे संरक्षण कसे होईल याबाबत स्पष्टता नाही..iPhone मध्ये लपलेत 'हे' 5 सिक्रेट फीचर्स, 90% भारतीयांना माहितीच नाहीत.मंत्रालयाने एक महत्त्वाचे ज्ञापन पाठवून सर्व विभागांना सूचना दिल्या की, घाईघाईने परदेशी एआय मॉडेल्स आणू नयेत. अर्थ मंत्रालयाचा प्रस्तावही सध्या बाजूला ठेवण्यात आला आहे. मात्र ही बंदी कायमस्वरूपी नसल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे..भारताचा स्वतःचा रोडमॅपसरकार आता पूर्ण लक्ष 'इंडिया एआय मिशन'वर घालत आहे. यासाठी सुमारे १०,३७२ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. स्वदेशी एआय मॉडेल्स आणि डेटासेट तयार करून भारत स्वावलंबी होण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे.एका वरिष्ठ सूत्राने सांगितले, “परदेशी तंत्रज्ञान चांगले असू शकते, पण राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणताही धोका घ्यायचा नाही.”.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.