

Bajaj electric scooter
esakal
बजाज चेतकने इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात नवा इतिहास रचला आहे. कमी बजेटमध्ये उत्कृष्ट रेंज आणि उच्च सुरक्षितता देणारी ही स्कूटर भारतीय ग्राहकांच्या मनात घर करून बसली आहे. जानेवारी 2020 मध्ये लॉन्च झालेल्या या इलेक्ट्रिक चेतकने आज 7 लाखांहून अधिक युनिट्स विक्रीचा टप्पा पार केला आहे. ही यशस्वी कहाणी पाहता इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात बजाजची मजबूत साथ दिसून येत आहे.