esakal | काळा धागा बांधण्यामागचे कारण आहे तरी काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती...
sakal

बोलून बातमी शोधा

Why tie a black thread to the foot and hand read full story

आपले शरीर हे पंचतत्त्वानी मिळून बनलेले आहे. ही पंच तत्वे म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश. यापासून मिळणारी सकारात्मक उर्जा आपल्या शरीराला उपयोगात येते. जेव्हा कोणाची वाईट नजर आपल्याला लागते तेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मात्र, ही नकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत येऊ नये आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार शरीरात सतत राहावा यासाठी काळा धागा बांधतात असं काही तज्ज्ञांचे मत आहे. 

काळा धागा बांधण्यामागचे कारण आहे तरी काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती...

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : काळा रंग हा नेहमीच अशुभ मानला जातो. कारण, या रंगाची अशुभ म्हणून ओळख आहे. काळ्या रंगाचे कपडे घालणे किंवा काळ्या रंगाची कुठलीही वस्तू विकत घेणे हे अशुभ मानले जाते. मात्र, आजकालच्या काळात काळ्या रंगाच महत्त्व वाढत चाललं आहे. त्यात काळ्या रंगाचा धागा बांधण्याचा ट्रेंड आला आहे. परंतु, काळ्या धाग्याच महत्त्व नेमकं आहे तरी काय?, काळा धागा नक्की कुठे बांधावा?, काय आहे काळा धागा बांधण्यामागचे कारण हे क्‍वचितच लोकांना माहीत आहे. चला तर जाणून घेऊया... 

आजकालच्या काळात तरुण पिढीमध्ये काळ्या रंगाचा धागा बांधण्याची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. पायाला काळ धागा बांधल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते किंवा कोणाची वाईट नजर लागत नाही अस अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी पायात काळा धागा बांधतात.


हेही वाचा - तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवतीचा पोलिसाने केला विनयभंग

आपले शरीर हे पंचतत्त्वानी मिळून बनलेले आहे. ही पंच तत्वे म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश. यापासून मिळणारी सकारात्मक उर्जा आपल्या शरीराला उपयोगात येते. जेव्हा कोणाची वाईट नजर आपल्याला लागते तेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मात्र, ही नकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत येऊ नये आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार शरीरात सतत राहावा यासाठी काळा धागा बांधतात असं काही तज्ज्ञांचे मत आहे. 

गळ्यात काळा धागा घालण्याचे विशेष महत्त्व

नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी अनेकजण काळ्या धाग्यामध्ये देवाच्या फोटोंचे लॉकेट गळ्यात घालतात. लहान बाळांनासुद्धा काळा धागा घालण्याचे आणि काळ्या रंगाचा टिक्का लावण्याचे विशेष महत्त्व आहे.

अधिक माहितीसाठी - "त्याला' बुडताना पाहून मित्र गेले पळून, नंतर सायंकाळी घडले असे...

नजर लावणाऱ्या व्यक्तीची एकाग्रता होते भंग

काळा धागा बांधल्यामुळे नजर लावणाऱ्या व्यक्तीची एकाग्रता भंग होते. यामुळे नकारात्मक ऊर्जा समोरील व्यक्तीला प्रभावित करू शकत नाही. अनेकवेळा पोटदुखीचा प्रचंड त्रास झाल्यास पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधतात. यामुळे पोटदुखी लगेच ठीक होते असेही काही जाणकार लोकांच म्हणण आहे. 

काळ्या धाग्यामुळे होतो धनलाभ

काळा धागा बांधल्यामुळे धनलाभ होतो असा दावा अनेकजण करतात. तुम्ही तुमच्या उजव्या पायात मंगळवारी काळा धागा बांधल्यास धनलाभ होतो. तसेच तुमच्या जीवनातील पैशांसंबंधीची समस्या दूर होते. शनी दोषापासून वाचण्यासाठी देखील काळा धागा उपयोगी ठरतो. काही लोकं फॅशन म्हणून तर काही लोकं नकारात्मक आणि वाईट शक्तीपासून बचाव करण्यासाठी काळ्या रंगाच्या धाग्याचा उपयोग करतात. काळ्या रंगाचा धागा वापरण्यावरून लोकांच्या मनात बऱ्याच श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहेत.